मराठी बातम्या /बातम्या /पुणे /कसब्यात विरुद्ध लढलेले धंगेकर-रासने आले एकत्र, गिरीश बापटांचा मान राखला, Video

कसब्यात विरुद्ध लढलेले धंगेकर-रासने आले एकत्र, गिरीश बापटांचा मान राखला, Video

कसब्यातले विरोधक रासने-धंगेकर एकाच व्यासपीठावर

कसब्यातले विरोधक रासने-धंगेकर एकाच व्यासपीठावर

कसबा पोटनिवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेले रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकत्र आल्याचं चित्र पुणेकरांना पाहायला मिळालं.

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 22 मार्च : कसबा पोटनिवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेले रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकत्र आल्याचं चित्र पुणेकरांना पाहायला मिळालं. निमित्त होतं खासदार गिरीश बापट यांच्या विकासनिधीतून कसबा मंदिरात उभारलेल्या भिंती चित्र लोकार्पण सोहळ्याचं. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे दोघं समोरासमोर येत असल्याने कसब्यात या दोघांच्या भेटीची चर्चा रंगली.

एकत्र आल्यानंतर धंगेकर आणि रासने आणि जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं मान्य केलं, पण धंगेकरांनी इथंही रासनेंना पाच-पाच संपर्क कार्यालयं उघडण्यावरून टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. कसबा मंदिरातल्या भिंती चित्र लोकार्पण कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, हेमंत रासने आणि आमदार रवींद्र धंगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

धंगेकर कसब्याचे जाएंट किलर

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये महाविकासआघाडीकडून लढलेले काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर जाएंट किलर ठरले. धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विजय मिळवला.

First published:
top videos