मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

...तरच कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध! पुण्यात भाजप-काँग्रेसची स्ट्रॅटेजी ठरली

...तरच कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध! पुण्यात भाजप-काँग्रेसची स्ट्रॅटेजी ठरली

कसबा विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आधीच स्पष्ट केलंय.

कसबा विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आधीच स्पष्ट केलंय.

कसबा विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आधीच स्पष्ट केलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Shreyas

पुणे, 23 जानेवारी : कसबा विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आधीच स्पष्ट केलंय, त्याला कारण दिलंय गेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली भूमिका, त्यामुळे भाजपने ही आक्रमक होत आज निवडणूक नियोजनाची बैठकीत घेतली आहे.

कमळ हे चिन्हच आमचा उमेदवार असेल असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पुणे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन स्पष्ट केलं आहे. तुल्यबळ इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजप नेमकी कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न आहे, मात्र उमेदवार पार्लिमेंटरी बोर्ड ठरवेल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मात्र बैठकीत बूथ कमिटीपर्यंत प्रचाराच नियोजन कसं करायचं? याचं नियोजन केलं असल्याच सांगत बिनविरोधसाठी प्रयत्न करूच मात्र निवडणुकीच्या ही तयारीत आम्ही आहोतच, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

आघाडीच्या जागावाटपात कसबा विधानसभेची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आहे त्यामुळे काँग्रेसने आधीच बैठक घेऊन निवडणूक लढवणार असल्याच सांगितलय. भाजपने गेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता फार कमी असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

कुटुंबाला उमेदवारी दिली तर बिनविरोध निवडणुकीची शक्यता जास्त असल्याची चर्चा आहे, मात्र टिळक कुटुंबिय वगळून उमेदवारी दिल्यास निवडणूक अटळ असल्याच चित्र सध्यातरी पुण्यात आहे.

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे दोन पोटनिवडणुका होणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांची अधिसूचना 31 जानेवारीला जारी होणार आहे, तर 7 फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या निवडणुकांचं मतदान 27 फेब्रुवारीला होणार असून 2 मार्चला निकाल लागणार आहेत.

कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक महाविकासआघाडी लढणार का? अजितदादांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

First published:

Tags: BJP, Congress