Home /News /pune /

वृद्ध महिलेला बाईकवर नेऊन परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकाने ठार मारले, आरोपीला अटक

वृद्ध महिलेला बाईकवर नेऊन परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकाने ठार मारले, आरोपीला अटक

गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे.

जुन्नर, 5 डिसेंबर : जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील चोरे मळ्यात राहणाऱ्या जानकाबाई अर्जुन चोरे (वय 65 वर्षे रा.साकोरी,ता.जुन्नर) या महिलेची हत्या करण्यात आली आहे. एका परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकाने दागिन्यांसाठी ही हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. या महिलेला साकोरी येथीलच अगदी एकांतात व चारी बाजूने ऊस असलेल्या बाह्मण मळ्यातील पप्पू जाधव यांच्या घरात नेण्यात आलं. त्यानंतर डोक्यात मारहाण करुन आणि नंतर गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की अर्जुन शुभनारायण प्रसाद(रा.सध्या साकोरी ता.जुन्नर,मुळ रा.खबशी,थाना-बनियापूर छपरा,जिल्हा-सारण(बिहार) हा इमारत बांधकाम व्यवसायिक गेल्या 7-8 वर्षापासून साकोरी परिसरात व्यवसाय करीत असल्याने त्याच्या गावातील बऱ्याच ग्रामस्थांबरोबर ओळखी वाढल्या होत्या. त्या ओळखीतूनच त्याने बाह्मण मळ्यातील पप्पू जाधव यांच्या मालकीचे घर राहण्यासाठी भाड्याने घेतले होते. बांधकाम व्यवसायातूनच ओळख झालेल्या जानकाबाई अर्जुन चोरे या महिलेला शुक्रवार दि.4 रोजी सकाळी 10 वाजता कामासाठी म्हणून दुचाकीवरुन घेऊन गेला असता सदर महिला संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही. त्यामुले पती अर्जुन चोरे यांनी चौकशी केली असता त्या बांधकाम व्यवसायिकाच्या दुचाकीवरुन कामाला गेल्याचे समजले. या माहितीवरुन अर्जुन चोरे हे काही ग्रामस्थांसह बांधकाम व्यावसायिक राहात बाह्मण मळ्यातील पप्पू जाधव यांच्या घरी गेले असता घराला कुलूप हो. त त्यामुळे त्यांना थोडी शंका आल्याने त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि कुलूप तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता जानकाबाई चोरे ही महिला मृतावस्थेत आढळली. सदर महिलेच्या अंगावर एकही दागिना नव्हता. याविषयी फिर्याद देताना मयत महिलेचा भाऊ बापू पांडुरंग साळवे रा.साकोरी यांनी असे सांगितले की कामावर नेण्याच्या बहाण्याने जानकाबाईला अगदी एकांतात असलेल्या घरात आणून डोक्यात मारहाण करुन नंतर गळा दाबून ठार मारले. तसंच अंगावरील अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले व कोणाला संशय येऊ नये म्हणून घराचे दरवाजाला कुलूप लावून पळून गेल्याचा संशय सदर बांधकाम व्यवसायिकावर आहे. याविषयी बोलताना जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी असे सांगितले की, विशेषतः महिलांनी कामावर जाताना अथवा प्रवास करताना मौल्यवान वस्तू अंगावर बाळगू नयेत जेणेकरुन आपल्या जीवाला धोका होईल. तसेच साकोरी गावचे सरपंच पांडुरंग साळवे यांनी असे सांगितले की पोलिसांच्या सुचनेवरुन बाहेरगावच्या किंवा परप्रांतियांना घरे भाड्याने देताना सदर व्यक्तीचे ओळखपत्र घेऊन ते ग्रामपंचायतीकडे जमा करावे. घरमालक पप्पू जाधव यांनी अर्जुन प्रसाद याचे ओळखपत्र ग्रामपंचायतीकडे जमा केल्याने संशयित मारेकऱ्याचा पत्ता व फोटो शोधण्यास सोपे गेले असून प्रत्येक घरमालकाने आपापल्या भाडेकरुंची माहिती ग्रामपंचायतीकडे जमा करावी असे आवाहन केले आहे. सदर घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.ए.पवार हे करीत आहेत. फरारी आरोपी अर्जुन शुभनारायण प्रसाद याला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन शाखा व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नाशिक येथे गुन्हा घडल्यानंतर 24 तासांच्या आत पकडल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune crime

पुढील बातम्या