मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

खोडद दुर्बीण प्रकल्पाचे जनक पद्मश्री डॉक्टर गोविंद स्वरूप यांचे वृद्धापकाळाने निधन

खोडद दुर्बीण प्रकल्पाचे जनक पद्मश्री डॉक्टर गोविंद स्वरूप यांचे वृद्धापकाळाने निधन

भारताला खगोल विज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यात डॉ स्वरूप यांच्या संशोधनाचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

भारताला खगोल विज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यात डॉ स्वरूप यांच्या संशोधनाचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

भारताला खगोल विज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यात डॉ स्वरूप यांच्या संशोधनाचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

जुन्नर, 7 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक तसेच भारतातातील रेडिओ खगोलशास्राचे जनक व खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्पाचे ( GMRT) निर्माते वैज्ञानिक डॉ. गोविंद स्वरूप (वय 91) यांचे आज सोमवारी सायंकाळी पुणे येथे खासगी रूग्णालयात अशक्तपणामुळे निधन झाले. पुण्यातील औंध येथील स्मशानभूमीत रात्री 11.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले.

भारताला खगोल विज्ञान क्षेत्रात अव्वल स्थानी नेण्यात डॉ स्वरूप यांच्या संशोधनाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी अशी ओळख असलेले डॉक्टर गोविंद स्वरूप यांचा जन्म उत्तराखंड राज्यात मुरादाबाद जिल्ह्यामध्ये ठाकुरद्वारा या तालुक्याच्या ठिकाणी 23 मार्च 1929 रोजी झाला. डॉक्टर स्वरूप यांचे वडील आणि आजोबा दोघेही उच्चशिक्षित होते. प्राथमिक शिक्षण गावातच झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण अलाहाबाद विद्यापीठात झालं. त्यांना डॉक्टर के.एस कृष्णन यांचे मार्गदर्शन लाभले. नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमण यांचे ते सहकारी होते.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर डॉ. स्वरूप यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत काम केलं. तिथे काम करताना ऑस्ट्रेलियात रेडिओ खगोलशास्त्राच्या शिक्षणासाठी त्यांना संधी मिळाली. पुढे अमरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांनी पीएचडी केली व भारतात रेडिओ खगोलशास्त्र या अभिनव विज्ञान शाखेची उभारणी करण्यासाठी ते पुन्हा भारतात परतले. डॉक्टर होमी भााभा यांनी टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या रेडिओ खगोल भौतिकी हा स्वतंत्र विभाग सुरू केला होता. त्यासाठी डॉ.स्वरूप यांना निमंत्रित केलं.

टीआयएफआरमध्ये आल्यावर डॉ. स्वरूप यांनी मुंबईजवळच्या कल्याण येथे 1965 च्या दरम्यान प्रायोगिक पद्धतीच्या रेडिओ दुर्बिणीची उभारणी केली. 1970 च्या दशकात तामिळनाडूतील उटी जवळ भारताची स्वतंत्र रेडिओ दुर्बीण उभारली. यामुळे भारताची जगभरात एक वेगळी ओळख तयार झाली. 1990 च्या दशकात डॉक्टर स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली.

जीएमआरटी म्हणून या रेडिओ दुर्बिणीचा जगभर लौकिक झालेला आहे. डॉक्टर स्वरूप यांना भारत सरकारच्या पद्मश्री, ब्रिटन सरकारचा ग्रेट रेबर यासह जगभरातील विविध वैज्ञानिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणासाठी खोडद गावी 'खोडद ग्रामीण विज्ञान केंद्रा'ची स्थापना त्यांनी केली आहे. डॉक्टर स्वरूप यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी सून जावई व नातवंडे असा परिवार आहे. भारताच्या रेडिओ खगोलशास्त्रात महत्त्वपूर्ण ठसा उमटवण्यासाठी डॉक्टर स्वरूप हे कायम स्मरणात राहतील.

First published:

Tags: Pune news