3 महिन्यांपासून पगार नाही, कसं जगायचं? पुणे जम्बो कोविड सेंटरमधील कोरोनायोद्धा रस्त्यावर

3 महिन्यांपासून पगार नाही, कसं जगायचं? पुणे जम्बो कोविड सेंटरमधील कोरोनायोद्धा रस्त्यावर

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर (Pune Jumbo Covid Center) सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

  • Share this:

पुणे, 16 डिसेंबर: पुण्यातील जम्बो कोविड सेंटर (Pune Jumbo Covid Center) सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आता जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे.

तब्बल तीन महिन्यांपासून पगार न झाल्यानं कोरोना योद्धांवर चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. जगावं तरी कसं? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

हेही वाचा...कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे वाजले बिगुल, 21 डिसेंबरला आरक्षणाची सोडत

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील नर्स, ब्रदर, कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या कंत्राटी नर्से, ब्रदर आणि कर्मचाऱ्यांना गेली तीन महिने पगार दिले गेले नाहीत. या सर्वांना कामावर घेताना एक पगार कपात करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्यानं आता नर्स आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जम्बो कोविड सेंटरबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

दरम्यान, जम्बो कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार करण्यासाठी 7.5 कोटी पीएमआरडीए जमा झाला असल्याची माहिती पुणे मनपा आयुक्त रूबल आगरवाल यांनी दिली आहे.

500 कर्मचारी पगारापासून वंचित...

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील नर्सेस आणि इतर सपोर्टींग स्टाफनं अचानक आंदोलन सुरू केलं केल्यानं मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जवळपास 500 कर्मचाऱ्यांरी पगारापासून वंचित आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती बेस्ट सर्व्हिस या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु कंपनी जेवढा पगार करारामध्ये ठरला होता. तेवढा देत नसल्याचा या कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, या आंदोलनामुळे रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे.

हेही वाचा...पीडितेची तक्रार न घेता धमकावलं, हवालदारानंच मध्यरात्री पाठवले अश्लिल मेसेज

सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात...

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर राज्य सरकारनं जम्बो कोविड सेंटर उभारलं आहे. मात्र, सुरुवातीपासून या ना त्या कारणामुळे हे कोविड सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आतापर्यंत जम्बो कोविड सेंटरमध्ये 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 16, 2020, 5:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या