पुणे जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग

पुणे जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता, लेकीसाठी माऊलीनं निवडला 'हा' मार्ग

आईला 'तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आली.

  • Share this:

पुणे, 24 सप्टेंबर: कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 33 वर्षीय प्रिया गायकवाड या महिलेला तिच्या आईनं पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला 'तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. मात्र, जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी आता या माऊलीला उपोषणचा मार्ग निवडवा लागला आहे. रागिणी सुरेंद्र गमरे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

हेही वाचा...'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO

जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे यांनी प्रशासनाला केला आहे. रागिणी गमरे यांनी आपल्या बेपत्ता लेकीसाठी जम्बो कोविड सेंटर समोरच आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी गमरे म्हणाल्या की, माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हातवर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय मिळायला हवा. कोटी रूपये खर्च करून आणि शासनानं ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे याठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधितावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणतंय प्रशासन...?

या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

हेही वाचा...कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे. संस्थात्मक रचनेतून गेलेल्या महिलेचा 20 दिवस तपास लागू शकत नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका स्थानिक प्रशासन आणि सरकारवर केली जात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading