मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातल्या आजींचा बाणा! रस्त्यावर पेन विकेन, पण भीक मागणार नाही...पाहा Photo

पुण्यातल्या आजींचा बाणा! रस्त्यावर पेन विकेन, पण भीक मागणार नाही...पाहा Photo

सोशल मीडियावर व्हायरल स्टोरी, व्हायरल फोटो , व्हायरल व्हिडिओ येणं ही काही आश्चर्याची बाब नाही. पण कधी कधी अशा काही पोस्ट येतात की, ज्यामधून आपण खूप काही शिकतो. या वयात रस्त्यावर पेन विकून गुजराण करण्याची वेळ या आजींवर आली आहे. पण त्यांच्या जगण्याचं स्पिरिट पाहा..

पुढे वाचा ...

पुणे, 18 ऑक्टोबर : सोशल मीडियाला अनेक जण नावं ठेवतात. भलत्याच गोष्टी इथे व्हायरल होतात आणि मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे यात शंका नाही. पण सोशल मीडियावरच्या काही स्टोरीज आल्याला जगायला शिकवतात, धडे देतात, हेही खरं. आता हेच बघा ना! पुण्यातील एका वयोवृद्ध आजीचा फोटो सध्या बराच व्हायरल होतोय. या आजीच्या जगण्याच्या स्पिरिटचं सध्या चांगलंच कौतुक केलं जात आहे.

युवकाच्या गळ्याभोवती कोब्र्यानं घातला विळखा अन्...; थराकाप उडवणारा VIDEO

तुम्ही हा फोटो पाहिला असेल कदाचित. फोटोतील वयोवृद्ध आजी पुण्यातली आहे. TV9 ने दिलेल्या बातमीनुसाीर या आजींचं नाव रतन आहे. ज्या वयात बसून आराम करायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची त्या वयात आजींवर रस्त्यावर पेनं विकायची वेळ आली आहे. पोटासाठी कष्ट कुणाला चुकलेले नाहीत. पण वृद्धत्वात जवळची रोकड संपली की, अनेक लोक देशोधडीला लागतात आणि त्यातले काही जण नाईलाज म्हणून भीक मागतात. दया येऊन अनेक लोक त्यांना भीकही घालतात. पण रस्त्यावर भीक मागणार नाही, कष्ट करेन हा बाणा या पुणेरी आजींनी या वयातही पाळला आहे. त्यांनी चक्क तशी एक पाटी लिहून घेतली आहे आणि त्याबरोबर त्या रंगीबेरंगी पेनं विकत आहेत.

मी रस्त्यावर राहून पेनं विकेन पण भीक मागणार नाही. आजीच्या या वृत्तीला अनेकांनी सलाम ठोकला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shikha Rathi (@sr1708)

पुण्यातील एका रहिवाश्याने या आजीचा फोटो शेअर केला आहे. पुण्यातील M.G रोड वरील हा फोटो आहे.

24 वर्षे वयातच 3 वेळा लव्ह मॅरेज; बनली 7 मुलांची आई, यूट्यूबरनं सांगितली आपली वेदनादायी कथा

आजी केवळ 10 रुपयांची पेनं विकते आहे. कुणी काही दया येऊन देऊ केलं, तर त्यांना आजी सांगते फुकट काही नको, पेनं विकत घ्या. या फोटोला जवळ जवळ हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. त्या रहिवाश्याने या फोटोतील कॅप्शन मध्ये, 'जर तुम्ही कधीही या पुण्यातील mg रोड ला भेट दिली, तर तुम्ही नक्कीच त्या आजीकडून पेन घ्यायला विसरू नका. यानं तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येईल', त्यानं असंही लिहिलं आहे.  पुण्याच्या या आजींचं नुसतं कौतुक करू नका. त्यातून काही तरी शिकता येईल आणि त्यातून जगण्याचा बोध घ्या.

First published:
top videos

    Tags: Pune, Viral photo