पुणे 04 ऑगस्ट: मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे तीन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.
कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्यातही येत्या 15 दिवसात चांगला पाऊस पडेल. त्यामुळे ऑगष्ट महिन्यात राज्यातील धरणसाठ्यातही नक्कीच समाधानकारक वाढ होईल, असंही कश्यपी यांनी सांगितलं.
राज्यात सध्या मुंबईसह घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचा जोर पुढचे तीन दिवस कायम राहिल, त्यानंतर थोडीसी उघडीप होऊन 9 ऑगष्टला राज्यात पावसाचा आणखी जोर वाढेल असंही कश्यपी यांनी सांगितलं.
पुण्यात लॉकडाउनमध्ये खळबळजनक घटना, घरकाम करणाऱ्या महिलेला लिफ्ट दिली अन्...
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.
गेल्या 24 तासांपासून मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रुझ भागात नाल्याला लागून असलेली 2 घरं कोसळली आहे. या दुर्घटनेत 1 महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या आहे. एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. तर दोन तासांच्या प्रयत्नानंतर जान्हवी काकडे नावाच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे.
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे तर नदी नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांताक्रुझमधील वाकोल्या परिसरात आज दुपारी नाल्याला लागून असलेली दोन घरं अचानक नाल्यात कोसळली. जोरदार झालेल्या पावसामुळे या घराच्या खालचा भाग हा ढासाळला होता आणि त्यानंतर हे घर पडले.
पुणेकरांसाठी 2 मोठ्या बातम्या; सर्व बंधनं उठणार, कपात टळणार
घरात राहणारी एक महिला आणि 3 मुली नाल्यात पडल्या. यात एका दोन वर्षांच्या मुलीला स्थानिकांनी वाचवलं. मात्र 16 वर्षाची मुलगी, 1 वर्षांची मुलगी आणि एक महिला अशा तिघांचा शोध सुरू आहे. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह घराच्या ढिगारा खालून बाहेर काढण्यात आला आहे. जान्हवी काकडे असं या मुलीचे नाव आहे. घराच्या कोसळलेल्या मलब्या खाली या मुलीचा अडकून मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.