मराठी बातम्या /बातम्या /पुणे /प्रेम पडलं महागात, प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ केले व्हायरल

प्रेम पडलं महागात, प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ केले व्हायरल

प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 03 फेब्रुवारी : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून कोयता गँगच्या दहशतीने पुणे परिसरात गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान याचबरोबर पुण्यात मारामारी, खून, यासारख्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील लोणी काळभोर येथे प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. अपहरण केल्यानंतर 24 वर्षीय बहिणीला विवस्त्र करून खोलीत डांबून ठेवून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा  : 'आई आत हो, अंगावर येईल' अन् बाहेर गुंड फेकत होते बिअरच्या बाटल्या, पुण्यातला भयावह VIDEO

या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ते 29 जानेवारी रोजी घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.

फिर्यादी महिला आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. आरोपी यांच्या नात्यातील युवतीस फिर्यादी तरुणीच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. त्यातूनच आरोपींनी फिर्यादी तरुणी आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. त्यांनी दोघींकडे युवतीचा ठावठिकाणा विचारला. दोघींनी त्याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे आरोपींनी दोघींना गजाने मारहाण केली. 

हे ही वाचा : कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर तरुणीस विवस्त्र करून तिचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. चित्रीकरण त्यांनी समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे निरीक्षक श्री. काळे हे तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news, Shocking video viral