पिंपरी चिंचवड, 1 सप्टेंबर : घरात लहान मुले खेळत असताना खूपच काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एक लहानशी चूक सुद्धा जीवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)मधून समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झोपाळा खेळत असताना 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून मृत्यू (8 Year old girl died) झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना पिंपरी चिंचवडमधील आहे. आपल्या मुलींना घरात खेळण्यासाठी सोडून शेख दाम्पत्य हे घराबाहेर गेले. त्यावेळी घरातील मुली सुद्धा खेळण्यात मग्न झाल्या. आपल्या सर्वात लहान असलेल्या मुलीला खेळवण्यासाठी मोठ्या बहिणींनी ओढणीचा झोपाळा बनवला.
‘काळ्या चिमणीची राख’ तिच्यावर टाकणं पडलं भारी; तरुणाचा खिसाच झाला खाली
या ओढणीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या झोपाळ्यावर 8 वर्षीय चिमुकली खेळत होते. मात्र, त्याच दरम्यान, झोपाळ्यावरुन तिचा पाय सरकरला आणि अचानक तिला गळफास बसला. या घटनेत 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास बसून मृत्यू झाला आहे.
चिमुकल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल कऱण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वांनाच एक मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे आपल्या लहान मुलांना एकटे घरात सोडून जाऊ नका. तसेच लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडे वारंवार लक्ष देणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.