पुण्यात विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून कचरा कुंड्यांचा वापर? आरोपानंतर महापौर संतापले

पुण्यात विसर्जनासाठी फिरते हौद म्हणून कचरा कुंड्यांचा वापर? आरोपानंतर महापौर संतापले

महापौरांनी आज थेट कचराकुंडी आणि फिरते हौद समोरासमोर आणून विरोधकांना खोटं पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.

  • Share this:

पुणे, 24 ऑगस्ट : पुण्यात फिरत्या विसर्जन हौदांचा वाद चांगलाच पेटला आहे. हे फिरते हौद कचरा कुंड्या असल्याचा आरोप विरोधकांनी करताच महापौर मुरलीधर मोहोळ चांगलेच संतापले आहेत. महापौरांनी आज थेट कचराकुंडी आणि फिरते हौद समोरासमोर आणून विरोधकांना खोटं पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.

पुण्यात फिरत्या विसर्जन हौदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेनं काल हे फिरते हौद म्हणजे कचरा कुंड्याच असल्याचा गंभीर आरोप करत विसर्जन बंद पाडलं होतं. आजही ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी याच मुद्यावरून महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांनाच उचलून नेलं आणि हे आंदोलन हाणून पाडलं.

विसर्जनाच्या पावित्र्य भंगाचा गंभीर आरोप झाल्याने महापौरांनी थेट कचरा कुंडी आणि फिरते हौदाच्या गाड्याच माध्यमांसमोर उभ्या केल्या. त्यासाठी आयुक्तांनाही सोबत घेतलं. गणेश विसर्जनासारख्या पवित्र विषयावरून विरोधक घाणेरडं राजकारण करत असल्याचा पलटवार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला.

दरम्यान, मनसेनं मात्र महापौरांचे आरोप फेटाळून लावले आहेत. महापौरांनी आधी पुणेकरांना विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मग बोलावं असा प्रत्यारोप मनसेचे नेते बाबु वागसकर यांनी केला आहे.

पुण्यात कोरोनाची साथ असल्याने यावेळी नदीपात्रात विसर्जनाला बंदी घातली गेली आहे. पण मग विसर्जनाला पर्याय काय असा सवाल विरोधकांनी करताच पालिकेनं फिरते हौद पुढे केले आणि याच फिरत्या हौदांवरून राजकारण पेटलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 24, 2020, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading