पुण्यात मानाच्या 5 गणपतीची अशी होणार प्रतिष्ठापना, असं आहे वेळापत्रक

पुण्यात मानाच्या 5 गणपतीची अशी होणार प्रतिष्ठापना, असं आहे वेळापत्रक

राज्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला यंदा कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

  • Share this:

पुणे, 22 ऑगस्ट : राज्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यामुळे गणेशोत्सवात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. पण, सर्व खबरदारी घेऊन मानाच्या 5 ही गणपतीची शांतपूर्ण प्रतिष्ठापना होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांना सहभागी होता येणार नाही. मात्र, दगडूशेठ समोर किमान एखाद धावत दर्शन तरी घेता याव म्हणून गर्दी झालेली पहायला मिळत आहे.

बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाकडून 'या' गोष्टी नक्की शिकायला हव्यात...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्सव मोठा करता येणार नाही म्हणून हिरमोड झाला आहे पण कोरोना संकटाच गांभीर्य सर्वांनी मान्य केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवातल्या नसलेल्या रांगोळ्यांचे गालीचे, मिरवणुकीचे ढोल आणि नटून थटून वाजत गाजत बाप्पाला न्यायला येणारी भक्ताची रीघ याशिवायचा गणेशोत्सव सुना सुना आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे. कोणताही गाजावाजा, गर्दी टाळून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.

मानाचे 5 गणपती प्रतिष्ठापना

1  -ग्रामदैवत कसबा

वेळ 11 वाजून 40 मिनिटं

हस्ते-दगडूशेठ गणपती उत्सव प्रमुख हेमंत रासने

2 -ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी

वेळ 11 वाजता, हस्ते अखिल मंडई गणपती मंडळ अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते

3 -गुरुजी तालीम

वेळ 12 वाजून 15 मिनिटं

हस्ते

भाऊ रंगारी मंडळाचे प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते

कोरोना काळातही घरबसल्या घ्या विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन, पाहा PHOTOS

4- तुळशीबाग

वेळ 11.30 हस्ते केसरी वाडा गणपतीचे विश्वस्त दीपक टिळक यांच्या हस्ते

5-केसरीवाडा

वेळ 10 वाजता

- केसरीचे विश्वस्त रोहित आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते स्थापना करणार आहे. तर आरती तुळशीबाग गणपती पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

मानाचे गणपती व्यतिरिक्त लोकप्रिय गणपती यांच्या गणेशाची  स्थापनाही होणार आहे.

दगडूशेठ

- वेळ 11 वाजून 10 मिनिटं

- हस्ते कसबा गणपती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते

- अखिल मंडई

दुपारी 12 वाजता

हस्ते तांबडी जोगेश्वरी मंडळ अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते

- भाऊसाहेब रंगारी

10 वाजता

गुरुजी तालीम मंडळ अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते

Published by: sachin Salve
First published: August 22, 2020, 9:44 AM IST

ताज्या बातम्या