मराठी बातम्या /बातम्या /पुणे /यंदा पुण्यात विसर्जन ऑनलाईनच पाहा; मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या

यंदा पुण्यात विसर्जन ऑनलाईनच पाहा; मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या

पुण्यात Coronavirus च्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना विसर्जन स्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विसर्जन सोहळा Online दिसेल. मानाच्या गणपतीच्या विसर्जनाचं असं आहे Time table

पुणे, 27 ऑगस्ट : पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणूक निघणार नाही. पुणेकरांनी अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळा ऑनलाईनच पाहावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. Coronavirus च्या धोक्यामुळे अनेक प्रतिबंध आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन स्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक हा सर्वाधिक आकर्षणाचा विषय असतो. लांबलांबून लोक हा सोहळा पाहण्यासाठी येतात. पण या वेळी मिरवणूक नसेल. मानाच्या गणपती मंडळांनी भव्य मिरवणूक न काढता  साधेपणाने विसर्जन करायचं ठरवलं आहे.  महापालिकेवर ताण नको म्हणून  विसर्जन हौदाची व्यवस्था मंडळं स्वतः करणार आहेत आणि त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.

असा असेल विसर्जन कार्यक्रम

परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी 10.30 कसबा गणपतीला हार घालतील आणि त्यानंतर 11.30 ला कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्याचप्रमाणे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती 12.15 वाजता विसर्जित होईल. मानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या गुरुजी तालीम आणि तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचं विसर्जन दुपारी 1 आणि 1.45  वाजता होईल. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा 2.30 वाजता विसर्जित होईल.

त्यानंतर श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दुपारी 3.15 ला विसर्जन होईल. सर्वाधिक आकर्षणाचा विषय असलेल्या दगडूशेठ गणपतीचं विसर्जन सूर्यास्तावेळी होणार आहे. तर अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचं संध्याकाळी 7 वाजता विसर्जन होईल.

पुण्यात मानाचे गणपती साधेपणाने, तरीही दिमाखात! पाहा VIDEO

पुण्याच्या मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मिरवणूक नसल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. घरात बसून ऑनलाईन विसर्जन सोहळा पाहावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

First published:
top videos