पूरग्रस्तांच्या प्रचंड रोषामुळे चंद्रकांत पाटलांना घ्यावा लागला काढता पाय

पूरग्रस्तांच्या प्रचंड रोषामुळे चंद्रकांत पाटलांना घ्यावा लागला काढता पाय

आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उघडपणे फार करता येत नाही विरोधकांनी टीका करावी त्यांचं ते कामच आहे. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना जे निकष लावले जे GR काढले ते पुण्यातही लागू करण्यात येणार.

  • Share this:

पुणे 27 सप्टेंबर : पुण्यात आलेल्या महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं. शेकडो संसार उद्धवस्त झाले अशी स्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात आले नव्हते. ते नवी दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीत उपस्थित होते. याबद्दल त्याच्यावर सर्वच स्तरातून टीकाही झाली होती. त्यामुळे पूपग्रस्तांमध्ये असंतोषही होता. अशा स्थितीत चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त होत होती. पाटील हे टांगे वाला कॉलनी परिसरात आले असता त्यांच्या विरुद्ध नागरिकांनी घोषणाबाजी केली. अरण्येश्वर कॉलनी परिसरातही त्यांना तोच अनुभव आला. त्यामुळे पाटील यांना काढता पाय घ्यावा लागला.

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

सगळं झाल्यावर तुम्ही फक्त काही फोटो काढण्यासाठी आलात का असा सवाल लोकांनी त्यांना केला. पाटील यांनी लोकांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना लोकांनी जुमानलं नाही शेवटी पाटीलच घटनास्थळावरून निघून गेले. काल नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत होते. मी दिल्लीतून सारखं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो  विरोधकांना काय टीका करायची ती त्यांनी करावी. तो त्यांचा अधिकार आहे असंही ते म्हणाले.

मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

नंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, विरोधकांना माझी आठवण येणं स्वाभाविक आहे. मी पूर आला त्या रात्री पासून जिल्हाधिकारी बाळा भेगडे, भीमराव तापकीर यांच्या संपर्कात होतो. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उघडपणे फार करता येत नाही विरोधकांनी टीका करावी त्यांचं ते कामच आहे. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना जे निकष लावले जे GR काढले ते पुण्यातही लागू करण्यात येणार.

पोलिसांच्या विनंतीनंतर ED कार्यालयात जाणार नाही, शरद पवारांची भूमिका

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मदत देणार अशी घोषणाही त्यांनी केली. आचारसंहिता भंग होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नये म्हणून काळजी घेतोय. 12 वर्षात एवढा पाऊस झाला नाही. डोंगरावरून पाणी आलं. कुणालाच अंदाज आला नाही. ना शासन, प्रशासन, हवामान विभाग ना मीडियाला. पुण्यात नाले ,ओढे वळवले गेले, अतिक्रमणे झाली याची समिती नेमून चौकशी करणार, अहवाल आल्यावर कारवाई करणार अशी घोषणाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 03:29 PM IST

ताज्या बातम्या