Home /News /pune /

अमेरिकेच्या कोर्टात पुण्यातल्या फार्मा कंपनीविरोधात कोरोना लशीचं तंत्रज्ञान चोरल्याचा दावा

अमेरिकेच्या कोर्टात पुण्यातल्या फार्मा कंपनीविरोधात कोरोना लशीचं तंत्रज्ञान चोरल्याचा दावा

अमेरिकन कंपनीने Covid Vaccine तंत्र चोरल्याबद्दल पुण्याच्या कंपनीविरोधात 95 कोटींचा दावा केला असला, तरी या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं पुण्यातल्या कंपनीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.

  दिल्ली, 23 मार्च : एचडीटी बायोकॉर्प (HTD Biocorp) या अमेरिकी बायोफार्मास्युटिकल कंपनीने वॉशिंग्टन (Washington) येथील फेडरल न्यायालयात (Federal court) पुण्यातल्या एमक्युअर (Emcure) फार्मास्युटिकल कंपनीविरोधात 95 कोटी डॉलरचा दावा दाखल केला आहे. यात या भारतीय कंपनीवर नवीन कोविड लसीची (Covid Vaccine) बिझनेस सीक्रेट्स चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एचडीटी बायोनं सांगितलं, ``आम्ही एमक्युअरची सहाय्यक कंपनी असलेल्या जेनोव्हाला (Gennova) भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी नवीन लस तंत्रज्ञानाचा (New Vaccine Technology) परवाना दिला होता. हे नवीन तंत्रज्ञान या फर्मनं चोरलं आहे.`` मात्र, या प्रकरणाशी एमक्युअर फार्माचा कोणताही संबंध नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.

  तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google या Apps द्वारे चोरी करतोय डेटा, रिसर्चमधून मोठा खुलासा

   ``आमची ही नवीन लस टारगेटेड पेशींना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आरएनए (RNA) वितरित करण्यासाठी लिपिड इनऑरगॅनिक नॅनोपार्टिकल फॉर्म्युलेशन अर्थात एलआयओएन (LION) वापरते,`` असं एचडीटी या अमेरिकी कंपनीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे जुलै 2020 मध्ये, एचडीटी बायोने संभाव्य कोविड लस विकसित करण्याकरिता मेसेंजर किंवा mRNA तंत्रज्ञान वापरण्यासाठी जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्ससोबत करारावर स्वाक्षरीदेखील केली होती.

  IPL 2022: आयपीएल तिकीट विक्रीला सुरुवात, कुठे खरेदी करू शकता? घ्या जाणून

   या प्रकरणाबाबत एमक्युअरच्या प्रवक्त्याला विचारलं असता त्यांनी माध्यमांना सांगितलं. ते म्हणाले, ``परवाना करार हा जो खटल्याचा विषय आहे, तो जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स आणि एचडीटी बायोकॉर्प यांच्यादरम्यान आहेत. एमक्युअर फार्माचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. या खटल्यात पक्षकार म्हणून कंपनीला चुकीच्या पद्धतीनं समाविष्ट केलं गेलं आहे. आमच्याविरुद्ध कोणाताही खटला नसल्याचं कायदेशीर तज्ज्ञांनी सांगितलं आहे. हे दावे रद्द करण्यासाठी कंपनी आवश्यक कायदेशीर पावलं उचलत आहे.``
  याबाबत जेनोव्हा कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ``या प्रकरणात कोणाताही कायदेशीर आधार नाही, असं आमचं म्हणणं आहे. कराराच्या किंवा कायद्याच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही, असा आमचा दावा आहे. आम्ही अशा क्षुल्लक खटल्यात प्रभावीपणे बाजू मांडू आणि बचाव करू.`` ``आमच्या तथाकथित मालकीच्या mRNAप्लॅटफॉर्मच्या जोरावर कोविड लस लॉंच करण्याचा आमचा मानस असल्याची घोषणा एमक्युअरने अलीकडेच केली आहे. परंतु, तो mRNA प्लॅटफॉर्म आणि लस एचडीटी बायो कॉर्पोरेशनची आहे,`` असं एचडीटी बायोकॉर्पनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. एमक्युअर आणि तिची सहाय्यक कंपनी एकत्रितपणे एचडीटीच्या बौद्धिक मालमत्तेची चोरी, परवाना कराराचे उल्लंघन करत आहे तसंच एचडीटीच्या अब्जावधी डॉलर्सच्या व्यापार सिक्रेट्सचा गैरवापर करत आहे, असंदेखील तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढं काय होतं, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
  First published:

  Tags: Corona vaccine, Coronavirus, Pune

  पुढील बातम्या