पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना, सराफा दुकानात दरोडेखोरांनी केली फायरिंग

पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना, सराफा दुकानात दरोडेखोरांनी केली फायरिंग

पुण्यामध्ये सराफाच्या दुकानात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येवलेवाडीत ही घटना घडली आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 21 नोव्हेंबर :  पुण्यामध्ये सराफाच्या दुकानात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येवलेवाडीत ही घटना घडली आहे. दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी  गोळीबार केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात दिवसभरातली ही  दुसरी फायरिंगची घटना आहे.

दरम्यान, या घटनेत कोणाला इजा झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बुधवारी सकाळी गोळीबाराचा असाच एक प्रकार सकाच्या सुमारास घडला. पुण्यात एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पती ब्रिजेश भाटी याने पत्नी अनुजा भाटी हिला गोळ्या घालून तिची हत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (सविस्तर बातमी लवकरच...)

First published: November 21, 2018, 4:30 PM IST

ताज्या बातम्या