VIDEO : पुण्याजवळील केमिकल फॅक्टरीत स्फोट, 5 किमीपर्यंत बसले हादरे; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही आग कुसुम डिस्टिलेशन आणि रिफायनरी नावाच्या कंपनीला लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुणे, 22 मे : पुण्याजवळील दौंडच्या कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील एका केमिकल कंपनीत आज मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा की जवळजवळ 5 किमी परिघात याचा आवाज ऐकू गेला. स्फोटानंतर कारखान्याच्या एका भागाला आग लागली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही आग कुसुम डिस्टिलेशन आणि रिफायनरी नावाच्या कंपनीला लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट दरम्यान कारखान्यात किती लोक होते हे अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे. कारखान्याच्या आसपास लोक एकत्र येऊ नयेत म्हणून बॅरिकेडिंग केले गेले आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात कर्मचारी होते का याचीही माहिती घेतली जात आहे. याबाबत पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला आहे.
Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have been rushed to the spot. More details awaited. #Maharashtrapic.twitter.com/fLq1rxuSAX
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. तसेच, नागरिकांनी घाबरून जाऊ नये.योग्य ती काळजी घेण्यात येत आहे, असे आवाहन केले.
Kusum Chemicals in Kurkumbh MIDC is on Fire.I spoke with Shri. Naval Kishore Ram-Pune District Collector.Administration has started the Relief Work.I am monitoring the situation and co-ordinating Relief measures along with the Administration.I urge all the citizens not to panic. pic.twitter.com/bqdWQ0zWfL