पुण्याच्या अग्निशमन दलाने बनवलं घरगुती आग विझवणारं सिलेंडर !

पुण्यातल्या ब्लुस्कोप या अग्निशमन यंत्रणा बनवणाऱ्या कंपनीने घरगुती आग विझवण्यासाठी आपोआप फुटून आग विझवणार एक सिलिंडर बाजारात आणला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 26, 2018 01:37 PM IST

पुण्याच्या अग्निशमन दलाने बनवलं घरगुती आग विझवणारं सिलेंडर !

पुणे, 26 मे : सध्या घरांची संख्या वाढत चालली आहे. त्यात आताची घरं एकमेकांच्या इतकी जवळ असतात की, जर काही अपघात झाला तर त्यातून त्यांना वाचवण्यासाठी किंवा आग लागली तर ती विझवण्यासाठी साध्या अग्निशन दलाच्या गाड्याही आतमध्ये येऊ शकत नाहीत. अशात पुण्याच्या अग्निशमन दलाने ही शक्कल लढवली आहे.

पुण्यातल्या ब्लुस्कोप या अग्निशमन यंत्रणा बनवणाऱ्या कंपनीने घरगुती आग विझवण्यासाठी आपोआप फुटून आग विझवणार एक सिलिंडर बाजारात आणला आहे. पुण्याच्या अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात आज या उपकरणाचा डेमो दाखवण्यात आला.

साधारण दीड फूट लांबीचं हे सिलिंडर घरात आग लागल्यास आपोआप फुटून आग विझवण्यासाठीचा गॅस तयार करतो आणि काही क्षणातच ही आग विझते. आग लागलेल्या ठिकाणी जर हे सिलिंडर नसेल तर या सिलिंडर मधली पावडर पाण्यात मिसळून आगीच्या दिशेने फेकल्यावर तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. घरगुती वापरासाठीच्या या सिलिंडर ची किंमत पाच हजारांपासून ते ९ हजारांपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2018 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close