पेटत्या कारवर मिळवलं नियंत्रण, ड्युटी संपून घरी जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाची कमाल

पेटत्या कारवर मिळवलं नियंत्रण, ड्युटी संपून घरी जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानाची कमाल

पेटलेली कार लवकरत विझली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानामुळे मोठा अपघात टळला.

  • Share this:

पुणे, 02 फेब्रुवारी : आज रात्री आठच्या सुमारास काञज, बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना घडली होती. पण पीएमआरडीए मारुंजी येथे कार्यरत असणारे जवान मयुर गोसावी यांनी ही घटना पाहताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत आपले कर्तव्य चोख बजावले.  बालाजीनगर येथील उड्डाणपूलावर होंडा सिटी कंपनीच्या कारने अचानक पुढील बाजूने पेट घेतला व रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. तेथून घरी जात असलेले पीएमआरडीए जवान मयुर गोसावी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पुणे अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागविली. या घटनेत कोणी जखमी नाही.

आग वेळीच विझवल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी व काञज अग्निशमन केंद्रातील जवान यांनी पीएमआरङीए जवान मयुर गोसावी यांचे कौतुक केले व पीएमआरङीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनीदेखील याची दखल घेत त्यांच्या या जवानाचे विषेश कौतुक केले. जवान मयुर यांचे वडील रामचंद्र गोसावी हे पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कार्यरत आहेत.

आपली ड्युटी संपवून घरी जात असतानाही त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. त्यामुळे मयुर यांचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. आग नेमकी काशामुळे लागली याची चौकशी पोलीस करत आहेत.

हेही वाचा...

आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका; पाक विद्यार्थ्याचा रोष

 

First published: February 2, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading