पुणे, 21 जानेवारी : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा आग भडकल्याची माहिती समोर येत आहे. सीरममध्ये दुपारी 3 च्या सुमारास आग लागल्यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र आता पुन्हा 4 तासानंतर ही आग धुमसल्याचं पाहायला मिळालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत असल्याचं समजते.
सीरमची आग लागलेली बिल्डिंग ही तीन मजली असली तरी हा प्रॉडक्शन प्लँट असल्यामुळे इथे प्रत्येक मजल्याचे दोन मजलेच बनवले गेले आहेत. पाचव्या मजल्यावरच पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला
आणि त्यानंतर कुलिंग सुरू असताना पुन्हा त्याच इमारतीत आग धुमसली होती. अखेर अग्निशमन दलाने खालूनच पाणी मारून ही आग विझवली. मात्र दुसऱ्यांचा लागलेली आग विझवताना तात्काळ सिडीचा वापर का केला गेला नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Maharashtra: Fire breaks out again in one compartment of the same building at Serum Institute of India (SII), in Pune. Fire fighting operation is underway. More details awaited.
— ANI (@ANI) January 21, 2021
Fire had broken out at Manjri Plant of SII today afternoon and claimed five lives. pic.twitter.com/6MKDWiCxZt
5 जणांनी गमावला आहे जीव
सीरम इनस्टिट्यूटच्या आग दुर्घटनेत सहाव्या मजल्यावर 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मयत हे बांधकाम मजूर होते. तसंच वेल्डिंग करताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
सीरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटला लागलेल्या आगीसंदर्भात अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सीरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Pune fire, Pune news