आर्थिक वादातून पुण्यात रॉड आणि तलवारीने मारामारी, पाहा अंगावर शहारे आणणारा CCTV

रॉड आणि तलवारीने झालेल्या या वादात तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर जहाँगीर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 10:46 AM IST

आर्थिक वादातून पुण्यात रॉड आणि तलवारीने मारामारी, पाहा अंगावर शहारे आणणारा CCTV

वैभव सोनावणे, प्रतिनिधी

पुणे, 16 ऑक्टोबर : पुण्यात काही केल्या गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आताही असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. त्याचे काही CCTV व्हिडिओदेखील समोर आले आहे.

रॉड आणि तलवारीने झालेल्या या वादात तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर जहाँगीर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढाला घेत आहेत.

भर दिवसा एखाद्या दुकानात शिरून तलावरीने आणि रॉडने मारहाण करण्याची आरोपींची मजल गेली आहे. त्यामुळे पुण्यात नागरिकांवर पोलिसांचा किती धाक आहे हे यातून समोर येतं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काही तरुणांकडून मारहाण करण्यात आली आहे. एका व्हिडिओमध्ये सर्व आरोपी रक्ताने माखलेले दिसत आहे. या सगळ्याची दखल घेत आता पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Loading...

इतर बातम्या - VIDEO: '15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...