Home /News /pune /

Pune: धारदार शस्त्राने सपासप वार मग दगडाने ठेचलं, पुण्यात बाप-लेकाची निर्घृण हत्या

Pune: धारदार शस्त्राने सपासप वार मग दगडाने ठेचलं, पुण्यात बाप-लेकाची निर्घृण हत्या

Father and son killed in Pune : पुण्यात एका तरुणाची आणि त्याच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    पुणे, 13 जानेवारी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुण्यात (Pune) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता पुन्हा एकदा हत्याकांडाने पुणे हादरलं आहे. हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीची आणि त्याच्या वडिलांवर हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्र आणि दगडाने केलेल्या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. पुण्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. (Youth and his father killed by group of people in Lonkikand area of Pune) काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, सनी शिंदे आणि कुमार शिंदे अशी मृतकांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी सचिन शिंदे या तरुणाची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात सनी शिंदे हा आरोपी होता. तो अटकेतही होता. नुकताच सनी शिंदे हा जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आलेल्या सनी शिंदे याचा टोळक्याने खेळ खल्लास केला आहे. काय घडलं नेमकं? बुधवारी सायंकाळच्या सुमारास सनी शिंदे हा आपल्या घराकडे निघाला होता. त्यावेळी एका टोळक्याने त्याला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला. दारदार शस्त्राने सनी शिंदे याच्यावर सपासप वार केले. इतकेच नाही तर जखमी झालेल्या सनीला टोळक्याने दगडाने ठेचण्यास सुरुवात केली. हे पाहून सनीचे वडील कुमार शिंदे हे त्याच्या बचावासाठी पुढे आले. यावेळी संतप्त टोळक्याने त्यांच्यावरही हल्ला चढवला. वाचा : पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात सनी शिंदे आणि आणि त्याचे वडील कुमार शिंदे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आपला तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सचिन शिंदे या तरुणाच्या हत्या प्रकरणातून सनी शिंदे आणि त्याच्या वडिलांची हत्या झाली आहे. सचिन शिंदे याच्या हत्या प्रकरणात सनी शिंदे हा अटकेत होता. सचिन शिंदे याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच या टोळक्याने सनी शिंदे याच्यावर हल्ला चढवला आणि त्यावेळी बाचावासाठी आलेल्या त्याच्या वडिलांचाही यात मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध पोलिसाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पैलवान नागेश कराळे यांची हत्या नागेश कराळे हे पैलवान असून ते कुस्ती तालीम चालवत असत. गुरुवारी (24 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास नागेश कराळे एका बिअर शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या जीपमध्ये बसले. त्याच दरम्यान मागून आलेल्या चारचाकी गाडून आरोपी उतरले आणि त्यांनी नागेश याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात नागेश कराळे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने परिसरता खळबळ उडाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Murder, Pune

    पुढील बातम्या