Home /News /pune /

रुग्णाच्या जीवासाठी डॉक्टरची धडपड; हाती घेतलं रुग्णवाहिकेचं स्टिअरिंग; VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्युट

रुग्णाच्या जीवासाठी डॉक्टरची धडपड; हाती घेतलं रुग्णवाहिकेचं स्टिअरिंग; VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्युट

पुण्यातील डॉक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च अ‍ॅम्ब्युलन्स चालवली, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

    पुणे, 25 ऑगस्ट : 23 ऑगस्ट रविवार, मध्यरात्रीचे तीन वाजले होते, कोव्हिड सेंटरमधील एका  रुग्णाची तब्येत अचानक खालावली. रुग्णाचं वय 71 वर्षे. रुग्णाला तात्काळ आयसीयू असलेल्या रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. मात्र अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हरच नव्हता. अशावेळी एका डॉक्टरने मागेपुढे न पाहता कोणताही विचार न करता आपल्या हातात अ‍ॅम्ब्युलन्सचं स्टिअरिंग घेतलं आणि रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचलवलं. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचला आहे. ही घटना आहे पुण्यातील. डॉ. रणजीत निकम आणि त्यांचे सहकारी डॉ. राजपुरोहित यांचं कौतुक केलं जातं आहे. याला कारण म्हणजे त्यांनी वेळेचं महत्त्वं समजून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड. दोघंही विलगीकरण केंद्रात काम करत होते. त्यावेळी 71 वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. या रुग्णाला तातडीने आयसीयू असलेल्या रुग्णालयात शिफ्ट करायचं होतं. कोरोना सेंटरमधील रुग्णवाहिका चालकाची तब्येत ठिक नव्हती आणि दुसऱ्या बदली ड्रायव्हरचा फोन लागत नव्हता. 108 क्रमांकावर फोन केला तर तिथंही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. हे वाचा - पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशासाठी छोट्याशा डुकरांची धडपड; हृदयस्पर्शी VIDEO VIRAL मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाचे नातेवाईकही या सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दुसरं कुणीच नव्हतं.  आता करायचं आहे, वेळ घालवून चालणार नाही, रुग्णाची प्रकृती बिघडत होती. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवणं गरजेचं होतं. मग काय शेवटी डॉ. रणजीत निकम आणि डॉ. राजपुरोहित यांनीच या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचं ठरवलं. डॉ. निकम यांनी डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. हे वाचा - पायात बळ नसलं तरी स्वावलंबी; भलीमोठी घागर घेऊन दिव्यांग महिला भरते पाहा VIDEO अ‍ॅम्ब्युलन्सचं स्टिअरिंग आपल्या हातात घेतलं आणि दीनानाथ रुग्णालयातून थेट सह्याद्री रुग्णालयात गाठलं. तिथं बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स पुना रुग्णालयाकडे वळवली आणि अखेर रुग्णाला तिथं दाखल करण्यात आलं. डॉ. निकम यांनी स्वराज्य तोरण न्यूजचा हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने  उपचार सुरू झाले आणि रुग्णाचा जीव वाचला. डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या