मराठी बातम्या /बातम्या /पुणे /प्लास्टिकच्या डब्यात कुत्र्याचं तोंड अडकलं, अग्निशमन दलाच्या जवानांनी असं सोडवलं, VIDEO

प्लास्टिकच्या डब्यात कुत्र्याचं तोंड अडकलं, अग्निशमन दलाच्या जवानांनी असं सोडवलं, VIDEO

Viral - रस्त्यारवर फिरणाऱ्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या डब्यात अडकलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सोडवलं. त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral - रस्त्यारवर फिरणाऱ्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या डब्यात अडकलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सोडवलं. त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral - रस्त्यारवर फिरणाऱ्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या डब्यात अडकलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सोडवलं. त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुणे, 01 जून : रस्त्यावर आपण काही वस्तू फेकतो किंवा कचऱ्यात काही लोकं प्लास्टिकचे डबे किंवा असं काही फेकत असतात. स्वच्छतेच्या दृष्टीनं विचार केला तर ते पूर्ण चुकीचंच आहे. पण याचा कशाप्रकारे इतरांना किंवा भटक्या प्राण्यांना त्रास होऊ शकतो, हे समोर आलं आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचं तोंड एका प्लास्टिकच्या डब्यात (Dog head stucked in plastik container) अडकलं. त्यानंतर तो कुत्रा प्रचंड तळमळ करत होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुटका केली.

(वाचा-नवरीबाईचा दरारा! सात फेरे घेण्याआधी केला हवेत गोळीबार, Video तुफान व्हायरल)

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंगळवारी एका भटक्या कुत्र्याच्या तोंडामध्ये एक प्लास्टिकचा डबा अडकल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारानंतर हा कुत्रा प्रचंड त्रासात असल्याचं पाहायला मिळालं. अडकलेलं तोंड निघावं यासाठी कुत्र्याची तडफड सुरू होतो. भटका कुत्रा असल्यामुळे कोणी त्याच्या तोंडात अडकलेला डबा काढण्यासाठी पुढंही येत नव्हतं. कुत्र्याला सोडवताना तो चावण्याचा धोका असल्यानं लोकही घाबरत होते.

(वाचा-देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रकखाली आली दुचाकी, थरार CCTV मध्ये कैद)

याबाबत कोणीतरी अग्निशन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानंतर अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचं अडकलेलं तोंड काढण्याचा प्रयत्न केला. जाळीमध्ये कुत्र्याला धरून नंतर मानेत अडकलेला प्लास्टिकचा डबा कापून त्याला या जवानांनी सोडवलं. मानेतून डबा निघताच हा कुत्रा लगेच त्याठिकाणाहून पळून गेला.

मुळात भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे. या कुत्र्यांना अनेकदा खाण्यासाठी काही मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावरील वस्तू खाताना असे प्रकार घडतात. अशा कुत्र्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही, त्यामुळं अनेकदा रस्त्यावरील असे कुत्रे पिसाळतात आणि अप्रिय घडनाही घडतात. या घटनेनंतर सोशल मीडियावर या कुत्र्याची सुटका करणाऱ्याचं कौतुक केलं जात असून याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Dog, Pune, Pune news