Home /News /pune /

पुणे : कुत्र्याला जिवंत जाळलं, आणखी 7 श्वानांचा मृत्यू; आतापर्यंत 19 मुक्या जीवांचा घेतला जीव

पुणे : कुत्र्याला जिवंत जाळलं, आणखी 7 श्वानांचा मृत्यू; आतापर्यंत 19 मुक्या जीवांचा घेतला जीव

पुण्यात काय चाललंय काय...आतापर्यंत 19 श्वानांना संशयितरित्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

    पुणे, 5 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) काही दिवसांपूर्वी एका पाळीव कुत्र्याला (Dog) इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची अमानुष घटना घडली होती, त्यानंतर एका कुत्र्याला पोत्यात टाकून जाळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात आणखी सात श्वानांचा मृतदेह आढळला आहे. हे कृत्य कोणी केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या प्रकरणात अज्ञातांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगवी परिसरातील पिंपलेगुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार नामक व्यक्तीचा पाळीव कुत्रा बाहेर फिरून घरात आला. तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आला आणि मृत्यू झाला. हे अचानक कसं घडलं हे बघण्यासाठी मुरार यांनी बाहेर शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना एक कुत्रा पोत्यात टाकून जाळल्याचे आढळून आले. तर एका कुत्र्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसले. त्याच बरोबर दोन कावळेही मृत अवस्थेत आढळून आले. हे ही वाचा-गृहिणींच्या कामाची किंमत पैशात होऊच शकत नाही पण..' शशी थरुर यांचं कंगनाला उत्तर सध्या पुण्यात आतापर्यंत 19 श्वानांना संशयितरित्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी मृत श्वान आढळलेल्या घटनस्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर पिंपळे गुरव सृष्टी चौक येथे आणखी सात भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पिंपळे गुरव परिसरातील शिवनेरी कॉलनी आणि सृष्टी चौक येथे श्वानांच्या मृतदेह सापडला आहे. श्वानांना जबरदस्तीने विष देण्यात आलं की अन्नातून विषबाधा झाली याबाबत तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी  7 महिन्यांच्या कुत्र्याला इमारतीच्या चवथ्या मजल्यावरून फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली होती.  पिंपरी शहरातील पिंपळे गुरव भागातील याच इमारतीच्या टेरिसवरून या भटक्या कुत्र्याला खाली फेकून देण्यात आलं होतं. ही बाब फरिनजहा शेख नामक महिल्याच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच प्राणीमित्र संघटना आणि खासदार मनेका गांधी यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधत प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची विनंती केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dog, Pune

    पुढील बातम्या