पिंपरी - चिंचवड, 14 जुलै : केवळ सोसायटीत कुत्रा (Dog) शिरला म्हणून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण (dog beaten) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील सांगवी (Sangavi) परिसरात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद (Caught in CCTV) झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवी सांगवी परिसरातील ज्या सुयोग सागर सहकारी सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. सोसायटी परिसरात घुसलेल्या भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण करून जखमी केले आहे. मारणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःचा जीव वाचविण्याच्या धडपडीत हा कुत्रा गाडीखाली लपतांना दिसत आहे.
सोसायटीत शिरलेल्या कुत्र्याला बेदम मारहाण pic.twitter.com/2qrVUvjeom
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2021
मात्र, ज्यावेळी हा कुत्रा सोसायटीतून बाहेर पडत होता त्यावेळी या तरुणाने त्याला लाकडी दांडका फेकून मारला. यामुळे कुत्राला दुखापत सुद्धा झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात घडलेल्या घटनेची ही CCTV दृश्य समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केला आहे.
त्याच सोसायटीतील एका गृहिणीने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. कुत्र्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी दिलीप चौगुले आणि निरंजन चौगुले अशा दोन व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Pimpri chinchawad