Home /News /pune /

झुंज अपयशी! पुण्यात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरचा बळी

झुंज अपयशी! पुण्यात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरचा बळी

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. COVID-19 मुळे डॉक्टरने प्राण गमावल्याची अशी पहिलीच घटना शहरात झाली आहे.

    पुणे, 22 मे : पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. COVID-19 मुळे डॉक्टरने प्राण गमावलेला अशी पहिलीच घटना शहरात झाली आहे. हे 56 वर्षीय डॉक्टर गेले काही दिवस कोरोनाशी लढत होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. एका डॉक्टरांच्या मृत्यूनंतर आता कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रुग्णांना तपासण्याच्या वेळी सर्वात जास्त संपर्काचा धोका वैद्यकीय व्यावसायिकांना असतो. खासगी डॉक्टरांनीही कुठल्याही रुग्णांना तपासताना पुरेशी सावधानता बाळगत संरक्षक उपकरणांसह तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पण सर्व डॉक्टरांकडे पुरेशा PPE किट्स आणि इतर आयुधं आहेत का हा प्रश्न आहे. पुण्यात डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. ते ससून रुग्णालयात होते भरती होते. या डॉक्टरांना इतर कोणताही त्रास नव्हता. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. पुण्याचा धोकाही वाढला लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणल्याबरोबर पुण्यात रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात पुण्यात तब्बल 291 रुग्णांची वाढ झाली. हे वाचा - पुण्यातील शुक्रवार पेठेत घडली भयंकर घटना, मृतदेह 3 तास रस्त्यावरच पडून पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात सर्वाधिक 291 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या 14 जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात 168 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 49 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आजच्या धक्कादायक आकडेवारीनंतर पुण्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4398 वर पोहोचली आहे. वाचा - मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 3977 आणि ससूनमध्ये 421 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही 1698 इतकी असून आतापर्यंत एकूण मृत्यू 241 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 2371 जण कोरोनातून बरे होवून घरी गेले आहेत. पुण्यात आज 1735 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. बरे झालेल्या रुग्णांमध्येही वाढ राज्यात आजपर्यंत एकूण 12583 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज झालेल्या 63 मृत्यूंपैकी मुंबईत 27 मृत्यू झाले आहेत. कधी थांबणार हा कहर? राज्यभरातून आली सगळ्यात धक्कादायक आकडेवारी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या