पुणे जिल्ह्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले, पोलिसांनी पुन्हा जप्त केला 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल

पुणे जिल्ह्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले, पोलिसांनी पुन्हा जप्त केला 2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल

या कारवाईत 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण दोन कोटी 35 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Share this:

सुमित सोनवणे, दौंड, 16 नोव्हेंबर : भीमा नदी पात्रात दौंड पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील शिरापूर गावच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली असून 9 फायबर बोटी, 8 सेक्शन बोटी, एक जेसीबी असा एकूण दोन कोटी 35 लाखाचा मुद्देमाल डीवायएसपी दौंडच्या पथकाने जप्त केला आहे. तसंच 8 जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस आणि त्यांच्या टीमने भीमा नदीच्या पात्रात शिरापूर येथील बोटींवर जाऊन फायबर बोटी जप्त केल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी पोलिसांकडून एक कोटी 20 लाखांच्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्धवस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज देखील पोलिसांकडून 2 कोटी 50 लाख रुपयांच्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी जप्त करण्यात आल्याने एक आठवड्यात 3 कोटी 70 लाख रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

या कारवाईमध्ये हवालदार दीपक कुमार वायकर, नंदकुमार केकान, सुभाष डोहिफोडे, धनंजय गाढवे, पवार आणि होमगार्डचे जवान सहभागी झाले होते. ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Published by: Akshay Shitole
First published: November 16, 2020, 5:16 PM IST

ताज्या बातम्या