Home /News /pune /

Pune Corona : पुण्यात भयानक रुग्णवाढ, दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित

Pune Corona : पुण्यात भयानक रुग्णवाढ, दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे, 20 जानेवारी : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे पुण्यात कोरोना संसर्गाच्या या तिसऱ्या लाटेतील (Corona Third Wave) सर्वाधिक रुग्णांच्या आकडेवारीची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात (Pune District Corona) आज दिवसभरात तब्बल 14 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 8 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे शहरात (Pune City Corona) कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये पुणे शहरातीलच रुग्णांची आकडेवारी ही सर्वाधिक आहे. पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 7 हजार 64 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराचा नंबर लागतो. पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 94 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण (Pune Rural) भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज तब्बल 2 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतून कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना राज्यातील इतर भागांमध्ये मात्र वेगळं बघायला मिळतंय. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढताना दिसतोय. यामध्ये पुणे, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांच्या नव्या आकडेवारीत महाराष्ट्र पहिला क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेदेखील यावर चिंता व्यक्त केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 563 नवे रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 563 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चंद्रपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतो. पण कालच्या तुलनेने आजच्या आकडेवारीत काहीशी घट झाल्याचं चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल दिवसभरात 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याने सक्रिय रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 2582 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभरात 227 रुग्णांनी कोरोनावर मात केली. (अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ) जळगाव जिल्ह्यात 451 नवे रुग्ण जळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 451 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 43हजार 705 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सध्या 3034 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आज दिवसभरात 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यवतमाळ जिल्ह्यातही उद्रेक यवतमाळ जिल्ह्यातही हल्ली नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट होताना दिसतोय. यवतमाळ जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 358 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या ही 1091 इतकी आहे. दरम्यान रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण सध्या गृह विलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 74,581 रुग्ण आढळले आहेत. तर 71,701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1789 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 9.25 टक्के आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 21.96 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.40 आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या