पुणे जिल्ह्यात खळबळ; मुंबईतील कोरोनाबाधित पाहुणा लग्नाला हजर, नवरा-नवरीसह अनेकांना लागण

लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

  • Share this:
जुन्नर, 12 जुलै : नुकत्याच लग्न झालेल्या नवरा-नवरीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शारीरिक अंतर पाळत या दोघाना संस्थात्मक क्वारन्टाइन होण्याची वेळ आली आहे. तर या लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लॉकडाऊन असताना 29 जूनला हा विवाह सोहळा जुन्नर जवळील एका मंगल कार्यालयात पार पडला होता. या सोहळ्याला जुन्नरचे आमदार, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष, यासोबत परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील 400 पेक्षा जास्त मंडळी उपस्थित होते. तालुक्यातील धालेवाडी येथील वधू आणि हिवरे बुद्रुक येथील वर यांचे या सोहळ्यात लग्न होते. मुंबईचा एक कोरोना पॉझिटिव्ह पाहुणा लग्न सोहळ्यात उपस्थित राहिला आणि त्याने विवाह सोहळ्यातील नवरा-नवरीसह अनेकांना बाधित केले. लग्नानंतर रात्री वरात झाली. त्यात सुद्धा मोठी गर्दी होती. नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे काल आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. येथील लग्न सोहळ्यासाठी आलेला पाहुणे,कार्यमालक,वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा नवरी कोरोनाबाधित निघल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. लग्न सोहळ्यात संपर्कातील अनेकांनी स्वतःहून आपली स्वॅब टेस्ट करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लेण्याद्री कोव्हिड सेंटरला दोन दिबसंपासून मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, या सोहळयात सहभागी झालेल्यांच्या संपर्कातील रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल नाही. तालुका प्रशासन आणि पोलीस मात्र अजूनही यावर गंभीर नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published: