Home /News /pune /

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : कट्टर विरोधक विजयी होताच अजित पवार म्हणाले...

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : कट्टर विरोधक विजयी होताच अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar reaction after Pune District Bank election result: जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पहायला मिळालं. या निवडणुकीच्या निकालानंतर अझित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 4 जानेवारी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आघाडी घेतली असली, तरी एका जागेवर दणकाही बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद (Pradeep Kand) यांनी सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र या जागेवर सुरेश घुलेंचा 14 मतांनी पराभव झाला. वर्षांपासून या बँकेवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उरलेल्या सात जागांसाठी रविवार, दोन जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी एका जागेवर अजित पवार यांचे कट्टर विरोधक प्रदीप कंद निवडून आले आहेत. या निकालानंतर नेमकी कुठे गडबड झाली याची माहिती घेतो अस अजित पवार म्हणाले. वाचा : अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या नितेश राणेंसाठी न्यायालयातून आली मोठी बातमी जिल्हा बँकेवर यापूर्वीचा 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 7 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व मिळवलं आहे. निवडणुकीत अजित पवारांना धक्का या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली तरी अजित पवार (Ajit Pawar) यांना एक मोठा धक्का बसला आहे. कारण, अजित पवार यांचे एकेकाही निकटवर्तीय असलेले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेले प्रदीप कंद हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत प्रदीप कंद यांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी रणनीती आखली होती. मात्र, असे असतानाही प्रदीप कंद हे 11 मतांनी विजयी झाले आहेत. तक्यामुळे प्रदीप कंद यांचा विजय हा अजित पवारांसाठी एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आबासाहेब गव्हाणे यांचा त्यांनी पराभव केला आहे. मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना धक्का देत राष्ट्रवादी कॉंगेसच्या सुनील चांदेरे यांचा विजय झाला आहे. सुनील चांदोरे यांना 28 मते मिळाली, तर कलाटे यांना 17 मते मिळाली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ajit pawar, Election, Pune

पुढील बातम्या