Home /News /pune /

पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील रहिवासी शाळेत कोरोनाचा शिरकाव; 48 मुलींसह 9 शिक्षकांना कोरोना

पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील रहिवासी शाळेत कोरोनाचा शिरकाव; 48 मुलींसह 9 शिक्षकांना कोरोना

शाळेतील 57 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे.

पुणे, 28 एप्रिल: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिरूर (Shirur) शहरालगत असणाऱ्या एका रहिवाशी मुलींच्या शाळेत (School) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शाळेतील ४८ मुली (48 girl students) आणि नऊ शिक्षक (9 teachers) अशा एकूण 57 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (57 tests covid positive) आली आहे. शालेतील 57 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अनेक स्तरावर कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तरी देखील ग्रामीण भागात नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे गांभीर्याने पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे. याबाबत शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शिरूर शहरालगत असणाऱ्या या शाळेमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती नगरपरिषदेला समजली. त्यानंतर या शाळेतील मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये या मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना झालेल्या मुलींनां शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहून येत असल्याने प्रार्दुभाव झाल्याची माहिती समजली आहे. वाचा: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 63309 रुग्णांचे निदान तर मृतकांचा आकडा धडकी भरवणारा शिरूर येथील निवासी शाळेतील मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषध उपचार सुरु करण्यात आले आहे. तसेच एका त्रास होत असलेल्या मुलींवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवण्याची व्यवस्था केली. शाळेच्या परिसरात नगरपरिषदेच्या वतीने फवारणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली. निवासी शाळेतील सर्व मुली व स्टाफ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असून आहे. इतरांना त्या शाळेत क्वारंटाईन केले असून गोळ्या औषधे देणे देण्याचे काम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Pune, School

पुढील बातम्या