PUBG पुन्हा ठरला यमदूत, पुण्यात 27 वर्षीय तरुणाचा धक्कादायक मृत्यू

PUBG पुन्हा ठरला यमदूत, पुण्यात 27 वर्षीय तरुणाचा धक्कादायक मृत्यू

हर्षल हा पब्जी गेम खेळत असताना विचित्र हावभाव करू लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

  • Share this:

अनिस शेख, प्रतिनिधी

देहूरोड, 18 जानेवारी : पबजी गेमने आतापर्यंत अनेक तरुणाईचा जीव घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये या गेमवर बंदीही घालण्यात आली पण यातून तरुणांची आत्महत्या काही थांबली नाही. पुण्याच्या देहूरोडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पबजी गेम खेळत असताना एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

पब्जी गेम खेळत असताना विचित्र प्रकारे हावभाव करून बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना देहूरोड येथील शिंदेवस्ती घडली. हर्षल मेमाने असे मृत्यूमुखी पडलेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 16 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास हर्षल हा पब्जी गेम खेळत असताना विचित्र हावभाव करू लागला आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला.

नातेवाईकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ जवळच असलेल्या ओजस रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मेमाने कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पबजी गेममुळे मानसिक संतुलन हरवल्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. मोबाइलवर सातत्याने पबजी गेम (PUBG) खेळल्यामुळे तरुणाई अत्यवस्थ आहे. त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये असंच एक प्रकरण समोर आलं होतं. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इतर बातम्या - मृतदेह घरात पडून राहिला पण डॉक्टरांनी नाही दिलं मृत्यू प्रमाणपत्र, कारण...

इंद्रजित कोळी (वय-20, रा. पोर्ले, ता.पन्हाळा) असे या तरुणाचे नाव होते. इंद्रजित हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो मोबाइलवर सातत्याने पबजी गेम खेळत होता. अनेक दिवसांपासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. शनिवारी (14 सप्टेंबर) इंद्रजित अचानक आरडाओरडा करू लागला. आई-वडिलांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला असता त्याने त्यांच्याशी वाद घातला. नंतर तो काही तासांतच घरी निघून गेला. इंद्रजितचे आई-वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे.

मोबाइल गेमचा अतिरेक झाल्याने इंद्रजितवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे डॉ. विजय बारणे यांनी सांगितले होते. इंद्रजितवर योग्य वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचेही डॉ. बारणे यांनी म्हटले होते.

इतर बातम्या - VIDEO : डोळ्यासमोर कोसळत होती दरड तरीही कार ड्रायव्हरनं गाडी पुढे आणली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dehupune
First Published: Jan 18, 2020 02:20 PM IST

ताज्या बातम्या