4 वर्षांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच : पुण्यात 'जबाब दो'चा नारा

4 वर्षांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच : पुण्यात 'जबाब दो'चा नारा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज चार वर्ष पूर्ण होतायत. तरीही मारेकरी अजूनही मोकाटच आहेत म्हणूनच सरकारच्या या निष्कियतेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज पुण्यात 'जबाब दो'चा नारा देण्यात आला.

  • Share this:

पुणे, 20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज चार वर्ष पूर्ण होतायत. तरीही मारेकरी अजूनही मोकाटच आहेत म्हणूनच सरकारच्या या निष्कियतेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज पुण्यात 'जबाब दो'चा नारा देण्यात आला. विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून ही निषेध रॅली काढण्यात आली, सोनाली कुलकर्णी, अमोल पालेकर आणि शैलजा दाभोलकर हे या निषेध जागरमध्ये सहभागी झाले होते. सोशल मीडियावरूनही ही 'जबाब दो'ची निषेध चळवळ चालवण्यात येतेय.

गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही अडीच वर्ष पूर्ण झाली. तर कर्नाटकातील प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येला ३० ऑगस्टला दोन वर्ष पुर्ण होतील. मात्र या तिघांच्याही हत्याप्रकरणात अद्याप म्हणावी तशी प्रगती नाही. पानसरे यांच्या खुनातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात अपयशी ठरलेत. या सगळ्याचा निषेध म्हणून आज संविधानिक मार्गाने आंदोलन करत 'निषेध जागर दिवस ' केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2017 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading