Home /News /pune /

TET Exam Scam: नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

TET Exam Scam: नाशिक आणि जळगावमधून दोघांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई

Representative Image

Representative Image

टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber police) आणखी दोघांना अटक केली आहे.

पुणे, 07 जानेवारी: टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber police) आणखी दोघांना अटक केली आहे. नाशिक आणि जळगाव मधून (Nashik and Jalgaon) अटक करण्यात आली आहे. तसंच बीडमधूनही (Beed) एका शिक्षकाला अटक केल्याचं समजतंय. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला तर बीडमधूनही नागरगोजे नावाचा शिक्षक एजंटला ताब्यात घेण्यात आलं आहे. नाशिक आणि जळगाव येथून अटक करण्यात आलेल्या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेतले आणि ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय 50, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हेही वाचा-  भारतात Omicron नं घेतला आणखी एकाचा जीव, महिलेचा मृत्यू दरम्यान यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय 48, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय 45 रा. लातूर) यांना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत याप्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक काही दिवसांपूर्वी टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam case) प्रकरणात दिल्ली कनेक्शनही (TET exam scam Delhi connection) समोर आलं होतं. 31 डिसेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा याला अटक (Ashutosh Sharma arrest from Delhi) केली. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली. (Tukaram Supe driver arrest in TET exam scam case) टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याला अटक करण्यात आली. तुकाराम सुपे याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा ड्र्रायव्हर सुनील खंडू घोलप यालाही अटक केली. सुनील घोलप याचा गुन्हात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्यानंतर 29 डिसेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Exam, Pune, Scam

पुढील बातम्या