• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुणेकरांना मोठा दिलासा! पेट्रोल पंप खुले; सामान्यांनाही हे नियम पाळून मिळणार इंधन

पुणेकरांना मोठा दिलासा! पेट्रोल पंप खुले; सामान्यांनाही हे नियम पाळून मिळणार इंधन

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच केवळ इंधन पुरवण्याचा नियम होता. तो आता आजपासून शिथिल करण्यात येणार आहे.

 • Share this:
पुणे, 5 मे : पुणे शहरात Coronavirus चा फैलाव आणि वाढते कोरोनारुग्ण पाहता लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले होते. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच केवळ इंधन पुरवण्याचा नियम होता. तो आता आजपासून शिथिल करण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सामान्य नागरिकांना काही नियम पाळून पेट्रोल/डिझेल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे शहरात सर्व पेट्रोल पंपांना सामान्य नागरिकांच्या गाड्यांसाठी पेट्रोल, डिझेल देण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच पेट्रोल पंपावर काम करावं. पेट्रोल डिझेल विकणाऱ्यांनी आणि भरून घेणाऱ्यांनी तोंडावर मास्क लावणं आवश्यक आहे. याशिवाय पेट्रोल पंप सुरू करण्याआधी काही नियम प्रशासनाने घालून दिले आहेत. त्यांची पूर्तता करणाऱ्यांनाच पेट्रोल -डिझेल देण्यात यावं, असं कळण्यात आलं आहे. काय आहेत नियम
 • दुचाकीवर एकच व्यक्ती असावी ,चारचाकीमध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना परवानगी
 • ऑटो रिक्षा,ओला,उबेर वाहने सोडून खासगी वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळेल.
 • Social distancing चे नियम पाळून पेट्रोल विक्री
 • पालिका हद्दीत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 दरम्यान पेट्रोल-डिझेल विक्री
सोमवारपासून देशभरात Lockdown3 चे बदललेले नियम लागू झाले असले, तरी पुण्यात अद्याप परिस्थिती जैसे थे होती. फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीच इंधन पुरवले जाईल, असा निर्णय पेट्रोल पुरवठादारांच्या संघटनेनं घेतला होता. कारण त्यांच्यापर्यंत सुधारित नियमावलीची आणि आदेशाची माहिती पोहोचली नव्हती. एका दिवसात दारू विक्रीतून किती महसूल जमा? आश्चर्यकारक आकडेवारी आली समोर पेट्रोल डीलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तिसरा लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी दिलेल्या सूचनांनुसार पेट्रोल -डिझेलबाबत नवीन सुधारित आदेश काय याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. त्याचं उत्तर कालपर्यंत आलेलं नव्हतं त्यामुळे पेट्रोल पंप कालपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंदच होते. ते आता सुरू होतील. अन्य बातम्या मोठी बातमी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत सरकारचा नवा आदेश World Asthma Day : अस्थमा अटॅक टाळण्यास मदत करतील 'हे' पदार्थ
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published: