पुणे, 24 मार्च : संचारबंदीत पोलिसांनी प्रबोधन तरी किती करायचं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिक आहेत, गुन्हेगार नाहीत म्हणून मारायचं नाही, असं ठरवलं तरी लोक ऐकत नाहीत. गरज नसताना रस्त्यावर गाड्या घेऊन येत आहेत. मात्र आम्हाला काही होत नाही म्हणत हिरोगिरी करत फिरणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी चांगल वठणीवर आणलं आहे.
येरवडा पोलिसांच्या टीमने विनामास्क कारण नसताना फिरणाऱ्या दोन तरुणांना थेट टीशर्ट काढूनच तोंडावर बांधायला लावला. पोलिसांच्या या हटके शिक्षेमुळे तरी लाज वाटून हे हिंडफिरे हिरो रस्त्यावर येणार नाही, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे.
#CoronavirusLockdown मास्क न लावता पुण्यात विनाकारण रस्त्यावर फिरत होते....पोलिसांनी टी-शर्ट काढून तोंडावर बांधायला लावला! pic.twitter.com/2H1jcSOjaP
— News18Lokmat (@News18lokmat) March 24, 2020
'आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका...'
'संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, कृपया घरीच रहा,' अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा- कर्फ्यूमध्येही मोकाट फिरणाऱ्यांचा होणार बंदोबस्त, महिला अधिकारी रस्त्यावर
मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यात होत असलेल्या साठेमारीवर वचक बसणार का, हे पाहावं लागेल.