जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune Crime News : कामगाराकडून आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार; पुणे हादरलं

Pune Crime News : कामगाराकडून आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार; पुणे हादरलं

3 गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

3 गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 8 जुलै : गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात घडलेल्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. नुकतेच पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयता हल्ला झाला होता. या हल्ल्यातून तरुणी थोकड्यात वाचली. या अगदोर दर्शना पवार नावाच्या तरुणीचा खून करण्यात आला होता. या घटना ताज्या असताना आता जिल्ह्यातील दौड तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. केडगाव परिसरातील आश्रम शाळेत 3 गतीमंद तरुणींवर मजूर कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. काय आहे प्रकरण? याबाबत अधिक माहिती अशी की, दौड तालुक्यातील केडगाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या पंडिता रमाबाई महिला आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्रम शाळेतील मजूर कामगारानेच हा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. मोजस जोरे असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. वाचा - फ्लॅटमध्ये 16 कुत्र्यांसोबत राहात होती महिला, 3 वर्षानी दरवाजा उघडताच दिसलं भयाण मोजेस हा आश्रम शाळेतील वॉल कंपाऊंड बांधणारा कामगार म्हणून गेल्या 3 महिन्यापासून त्या ठिकाणी काम करत होता. आरोपीने महिला आश्रमातील 3 गतीमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात बालनिरीक्षणगृहातून येरवडा मनोरुग्णालयात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडित मुलाच्या हातात तब्बल 18 इंजेक्शनच्या सुया आढळल्या आहेत. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर येरवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात