Home /News /pune /

Pune Crime : एवढा कसला राग! 13 वर्षाच्या मुलाने जन्मदात्या पित्याची केली निर्घृण हत्या, कारण अगदीच क्षुल्लक

Pune Crime : एवढा कसला राग! 13 वर्षाच्या मुलाने जन्मदात्या पित्याची केली निर्घृण हत्या, कारण अगदीच क्षुल्लक

Pune Crime Son stabbed father: अगदी क्षुल्लक कारणावरून 13 वर्षांचा मुलगा इतका चिडला की, त्यानं थेट पित्याच्या पोटात चाकू खुपसला.

पुणे, 20 मे : पुण्याच्या कात्रज (Pune Katraj) परिसरामध्ये रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलानं पित्याचीच हत्या केल्याचा प्रकार (Son stabbed father to death) घडला आहे. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील वादाच्या क्षुल्लक कारणावरून (argument in family) या मुलानं रागाच्या भरात थेट वडिलांची घरातल्या चाकूनं भोसकून हत्या केली. (वाचा-Pune : दान करायचे सांगून भामट्यांनी लांबवले भाजी विकणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र) पुण्याच्या कात्रजमध्ये जांभूळवाडी भागामध्ये दस्तगिर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दस्तगीर यांचा मुलगा आणि मुलगी यांचे घरामध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाले होतं. भावा बहिणीच्या नेहमीच्या भांडणासारखं हे भांडण होतं. त्यावर दस्तगिर यांनी त्यांच्या 13 वर्षाच्या मुलाला हाताने मारले. आता 13 वर्षाच्या मुलाला वडिलांनी मारणं ही तशी काही फार मोठी बाब नाही. मात्र दस्तगिर यांच्या मुलाला वडिलांनी मारणं सहन झालं नाही. या संपूर्ण प्रकारामुळं त्याला प्रचंड राग आला आणि या रागामध्ये तो होत्याचं नव्हतं करून बसला. (वाचा-Jalna News : DYSP सह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं) बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून वडिलांनी आपल्यालाच मारलं म्हणून दस्तगिर यांच्या मुलाला राग अनावर झाला. त्यानं घरातला चाकू घेतला तो चाकू थेट वडिलांच्या पोटात खुपसला. यात दस्तगीर यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दस्तगिर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोनाच्या सध्याच्या संकटाच्या काळात सगळेच अनेक दिवस घरातच आहेत. त्यामुळं चिडचिडेपणा किंवा रागाचं प्रमाण वाढलेलं आहे. तज्ज्ञांनी देखील एकाच वातावरणात राहून अशाप्रकारे चिडचिडेपणा वाढणं शक्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे. हा प्रकार तशाच चिडचिडीतून झाला आहे का? हे समोर आलेलं नाही. मात्र या काळामध्ये कुटुंबीयांबरोबर आपलं नातं अधिक दृढ करून यातून बाहेर निघणं म्हत्त्वाचं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Murder, Pune, Pune crime news

पुढील बातम्या