मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune : सोबत दारु प्यायल्यानंतर मित्राचीच हत्या, वादानंतर फावड्याच्या दांड्याने मारत घेतला जीव

Pune : सोबत दारु प्यायल्यानंतर मित्राचीच हत्या, वादानंतर फावड्याच्या दांड्याने मारत घेतला जीव

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

Pune Murder News फावड्याच्या दांड्यानं राजेशच्या डोक्यात मारल्यानं मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होतं. काही वेळानं किसननं राजेशचा मृतदेह एका वर्गामध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर तो घरी निघून गेला.

पुणे, 3 जून : किरकोळ वाद किती टोकाला जाऊ शकतात याचं उदाहरण पुण्यात (Pune Crime ) घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतून समोर आलं आहे. पुण्यात एका मित्रानं दुसऱ्या मित्राला फावड्याच्या दांड्यानं एवढं (Friends Murder) मारलं की त्याचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत झालेल्या वादातून त्यानं मित्राची हत्या केली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी हा तरुण स्वतः पोलिसांकडे गेला आणि त्यानं स्वतःचा गुन्हा कबूल केला.

(वाचा-'आपला तुरुंगच बरा...',पॅरोलवर घरी आलेल्या कैद्यांकडून जेलमध्ये जाण्याची मागणी)

राजेश सहानी आणि किशन वरपा हे दोघं मित्र होते. दोघांनाही दारुचं व्यसन असल्यामुळं अनेकदा दोघंजण एकत्र दारु प्यायचे. रविवारीदेखिल रमेश आणि किसन एकत्र दारु प्यायला गेले होते. दोघे एकत्र बसून दारु प्यायले. त्यानंतरही त्यांचं मन भरलं नाही म्हणून दोघं तिथून सिंहगड याठिकाणी गेले. तिथं जाऊनही ते दोघं दारु प्यायले. त्यानंतर ते परत आले. गरवारे महाविद्यालय याठिकाणी आल्यानंतर त्यांनी कंपाऊंडवरून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी सोबत आणलेली दारु प्यायला सुरुवात केली.

(वाचा-मित्रांच्या मदतीनं प्रेयसीचे Video बनवले, Blackmail करत सर्वांनी केले अत्याचार)

दोघांनी गरवारे महाविद्यालयात बसून दारु प्यायली. या दरम्यान काहीतरी कारणावरून त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद एवढा वाढत गेला की, किसन यानं राजेशला मारायला सुरुवात केली. त्यानं राजेशला फावड्याच्या दांड्याने मारहाण सुरू केली. त्यानं फावड्याच्या या दांड्यानं राजेशच्या डोक्यात मारल्यानं मोठ्या प्रमाणावर रक्त वाहत होतं. काही वेळानं किसननं राजेशचा मृतदेह एका वर्गामध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर तो घरी निघून गेला.

राजेश रात्रभर घरी आला नाही, म्हणून पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. पण किसन स्वतः पोलिसांकडे हजर झाला. त्यानं झालेला सर्व प्रकार सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं असता, राजेशचा मृतदेह त्यांना मिळाला. दारुच्या नशेपायी अगदी किरकोळ कारणावरून मित्रच दुसऱ्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.

First published:

Tags: Murder, Pune crime, Pune crime news, Pune news