पुणे, 28 ऑक्टोबर: पुण्यातून (Pune City)एक वेगळीच घटना समोर आली आहे. शाळेत मारायचा म्हणून तब्बल 16 वर्षांनी एका मित्रानं दुसऱ्या (beaten friend) मित्राला बेदम मारहाण केली आहे. या मारहाण प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेत असताना वर्गातला एक मुलगा आपल्याला खूप मारायचा. हा राग मनात ठेवून तब्बल 16 वर्षांनंतर एका मित्रानं दुसऱ्या मित्राला रस्त्यात गाठलं आणि बेदम मारहाण केली आहे. एवढं करुन त्याच समाधान न झाल्यानं मित्राच्या राहत्या घरात घुसून त्याला पुन्हा मारहाण केली आहे. पुण्यातल्या औंध परिसरात एम्स हॉस्पिटलसमोर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विकी शिरतर आणि त्याचा अनोळखी मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी कोण करणार?, NCB नं दिलं उत्तर
33 वर्षीय अमोल अंकुश कांबळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 24 ऑक्टोबरला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमोल कांबळे हे घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या विकी शिरतरनं कांबळे यांना थांबवलं.
त्यानंतर विकीनं अमोल यांना मला ओळखलं का? असं विचारलं. त्यावर अमोल म्हणाले की, तू आणि मी सोबत एका वर्गात शिक्षण घेत होतो. असं म्हटल्यावर विकीनं त्यांना तू मला शाळेत असताना खूप मारत होतास. आता तू सापडलास तुला सोडणार नाही. त्यानंतर विकीनं अमोल यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा- Breaking News: महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरडलं, तिघींचा मृत्यू
या मारहाणीनंतर कांबळे यांनी विकीच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन आपलं घर गाठलं. मात्र त्यानंतर विकी आणि त्याच्या मित्रानं कांबळे याचं घर गाठलं आणि त्यांच्या घरात घुसले. अमोल कांबळे यांना लाकडी बॅटनं बेदम मारहाण करत जखमी केलं. यानंतर अमोल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune