जामीन आणि जंगी स्वागत! गजा मारणे प्रकरणानंतर पुण्यात पुन्हा गुंडाचं फटाके फोडून स्वागत

जामीन आणि जंगी स्वागत! गजा मारणे प्रकरणानंतर पुण्यात पुन्हा गुंडाचं फटाके फोडून स्वागत

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या (Gajanan Marane) मिरवणुकीची घटना ताजीच असताना पुण्यातून आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. जामिनावर सुटलेल्या आरोपींचे पुण्यातील शिवणे याठिकाणी फटाके फोडत जंगी स्वागत करण्यात आले.

  • Share this:

पुणे, 25 मार्च: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेच्या (Gajanan Marane) मिरवणुकीची घटना ताजीच असताना पुण्यातून आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. जामिनावर सुटलेल्या आरोपींचे पुण्यातील शिवणे याठिकाणी फटाके फोडत जंगी स्वागत करण्यात आले. याप्रकरणी उत्तम नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. उत्तम नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे, पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे तर इतर काही जणांचा शोध सुरू आहे.

हे आरोपी कोणत्याही साधा गुन्ह्यामध्ये येरवडा कारगृहात (Yerwada Jail) नव्हते. खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या आरोपींची सुटका जामिनावर सुटका झाली. हे चारही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे शिवणेमध्ये फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं. शिवाय त्यांनी स्थानिकांबरोबर दमदाटी केल्याची घटना देखील समोर आली आहे. याप्रकरणी सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड, सागर गौड आणि यांचा समर्थक सुरज गौडला अटक करण्यात आली आहे. तर इतर फरारी साथीदारांचा शोध उत्तमनगर पोलिसांकडून सुरू आहे.

या आरोपींविरोधात गेल्यावर्षी उत्तम नगर पोलीस (Uttam Nagar Police Station) ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. यानंतर सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौडला अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती आणि त्यांना येरवडा कारागृहात पाठवले होते. मंगळवारी त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. शिवणे याठिकाणी त्यांच्या साथीदारांनी त्यांचे जंगी स्वागत केले, फटाके फोडून त्यांनी स्वागत केले. शिवाय स्थानिकांवर अरेरावी देखील केली. पोलिसांना घडल्याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ते त्याठिकाणी पोहोचले पण अद्याप सहा सातजण फरार असल्याची माहिती मिळते आहे.

गजा मारणे प्रकरणातही घडला होता असाच प्रकार

अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अगदी सिनेमा स्टाईलने गजा मारणे तळोजा कारागृहाच्या गेटमधून गाडीत उभा राहून हात उंचावून मोठ्या थाटात बाहेर पडला. यावेळी जेलसमोरूनच त्यांच्या गुंडांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 25, 2021, 1:21 PM IST

ताज्या बातम्या