पुणे, 21 एप्रिल: पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह घरात आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 75 वर्षीय सेवानिवृत्त कर्नल (Retired Colonel) यांचा समावेश आहे. पुण्यातल्या मुंढवा भागात ही घटना घडली आहे.
पुण्यातील मुंढवा भागात बुधवारी संध्याकाळी लष्करातील 75 वर्षीय सेवानिवृत्त कर्नल आणि त्यांची 63 वर्षीय पत्नी गोळ्या (Gunshot) झाडलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा यांनी त्यांची पत्नी चंपा हिला गोळ्या घालून ठार मारलं आणि नंतर आत्महत्या केली असा पोलिसांना संशय आहे.
पोलीस उपायुक्त (झोन 5) नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील एका गृहनिर्माण संस्थेत बुधवारी ही घटना घडली. त्यानंतर जोडप्याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. कारण दोघेही जण काही दिवसांपासून दिसत नव्हते.
IPS ची अफलातून शक्कल..! Facebook वर रिक्वेस्ट पाठवून आरोपीला अडकवलं जाळ्यात
आम्हाला माहिती मिळताच आमचे ऑन-ड्युटी पेट्रोलिंग मार्शल फ्लॅटवर पोहोचले आणि दरवाजा उघडला. घराच्या बेडरुममध्ये हे दोघांवर बंदुकीच्या गोळ्या झाडलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गोळी झाडली आणि नंतर 12 बोअरच्या रायफलने हनुवटीच्या खाली गोळी झाडली, असे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं डीसीपी पाटील यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत आम्हाला एकही चिठ्ठी सापडलेली नाही. आम्ही कुटुंबीयांना कळवले आहे. या जोडप्याच्या मुलांपैकी एक सेवारत लष्करी अधिकारी आहे, आम्ही त्यांना याबाबतची माहिती दिली असल्याचं डीसीपी पाटील यांनी म्हटलं.
पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणी अधिक तपास केला जाईल. तसंच अधिक माहितीसाठी कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांची चौकशी करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.