पुण्यात भरदिवसा खून, गळा चिरून 34 वर्षीय व्यक्तीला संपवलं

पुण्यात भरदिवसा खून, गळा चिरून 34 वर्षीय व्यक्तीला संपवलं

वर्धमान सांस्कृतिक भवनाच्या समोर असलेल्या कालिदास जागडे मैदानात ही घटना घडली आहे.

  • Share this:

पुणे, 27 जून : गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या मालिकेनं हादरलेल्या पुणे शहरात आज भरदिवसा एक खून झाला आहे. प्रकाश खाजप्पा काणेकर (वय 34) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. वर्धमान सांस्कृतिक भवनाच्या समोर असलेल्या कालिदास जागडे मैदानात ही घटना घडली आहे.

दारू पिण्याच्या वादातून गळा चिरून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत प्रकाश खाजप्पा काणेकर हा कालिदास जागडे मैदानात सेक्युरिटी म्हणून काम करत होता. तेव्हा 2 व्यक्तींसोबत त्याचं दारूच्या कारणावरून भांडण झालं. नंतर हे भांडण विकोपाला गेलं आणि यातच प्रकाश काणेकर याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 2 संशियातांना ताब्यात घेतलं आहे.

दोन्ही संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती आहे. या हत्येप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

दरम्यान, लॉकडाऊन काळात कमी झालेली गुन्हेगारी लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा वाढली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये सतत खून, मारामारी अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाचं संकट असताना कायदा-सुव्यवस्था टिकवण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 27, 2020, 10:07 PM IST

ताज्या बातम्या