सुमित सोनवणे, दौंड, 17 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये कुसेगाव इथं एका व्यक्तीच्या डोक्यात वार करुन मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे. उत्तम पवार असं या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उत्तम पवार हे दौंड तालुक्यात नव्याने सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गावरील कुसेगाव येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर टँकरने पाणी देण्याचे काम करत होते. मात्र आता अचानक गावातील ओढ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा - पुण्यातील ग्रामीण भागात ड्रग्स माफियाला अटक, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त
हत्येच्या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि दौंडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखमा आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या खून प्रकरणाबाबत पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.