पुणे, 14 मार्च : कुख्यात गुंड छोट्या राजनच्या पुतणीनं तिच्या साथीदारांच्या मदतीनं पुण्यात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादाचं प्रकरणी मिटवण्यासाठी पुतणीनं शहरातील एक तरुणाकडे ही खंडणी मागितली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे गुन्हे शाखेनं खंडणी घेताना एकाला पकडलं असून या तिघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेनं आपल्या दोन साथीदारांसह हा खंडणीचा कट रचला होता. त्यातील एक जण खंडणी घेण्यासाठी अरोरा टॉवर परिसरात आला होता. 25 लाखांची खंडणी घेताना त्याला पुणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आणि चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणानं खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून खंडणी प्रकरणातील एकाला अटक केली आहे. तक्रारदार तरुणाची पत्नी आणि मेहुणी यांचा अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी कुख्यात गुंड छोटा राजनच्या पुतणीनं आपल्या दोन साथीदारांसोबत संगनमत करून तक्रारदारविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू झाला. हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रियदर्शनी निकाळजेनं 50 लाखांची खंडणी मागितली होती.
हे वाचा-...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना भोगावा लागणार 21 वर्ष तुरुंगवास, सरकारचा अजब फतवा
Pune Police: Case registered against three people, including Priyadarshini Nikalje (Chhota Rajan's niece) for extortion. One accused arrested, search for others underway. #Maharashtra pic.twitter.com/IK1TzHW7oe
— ANI (@ANI) March 14, 2020
एवढे पैसे नसल्यानं अर्धे पैसे देण्यासाठी फिर्यादार गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या या तरुणाला बेड्या ठोकल्या. चौकशीअंती ही खंडणी छोटा राजनच्या पुतणीनं मागितली असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खंडणी विभागाचे अधिकारी आणि अप्पर पोलीस आयुक्तांनी खंडणी घेणाऱ्याला रंगेहात पकडलं आहे. या प्रकरणी कुख्यात गुंड छोट्या राजनच्या पुतणीसह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचा-‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर