Home /News /pune /

Pune CCTV: बिर्याणीवरुन पुण्यात राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने दुकानदारावर हल्ला, धक्कादायक VIDEO आला समोर

Pune CCTV: बिर्याणीवरुन पुण्यात राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने दुकानदारावर हल्ला, धक्कादायक VIDEO आला समोर

पुण्यात बिर्याणीवरुन जोरदार राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने दुकानदारावर हल्ला, VIDEO आला समोर

पुण्यात बिर्याणीवरुन जोरदार राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने दुकानदारावर हल्ला, VIDEO आला समोर

Pune attack on biryani seller caught in cctv: पुण्यात जमावाने बिर्याणी विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

पुणे, 16 जानेवारी : पुण्यात पुन्हा एक जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर तुफान हाणामारी (fight over biryani money) झाली. ही घटना हडपसर (Hadapsar) येथे घडली असून बिर्याणी शॉपच्या सीसीटीव्हीत कैद (incident caught in CCTV) झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. या सीसीटीव्हीत दिसत आहे की, बिर्याणीच्या पैशांवरुन झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर हल्ला चढवला. (Pune biryani seller beaten by group of youths, caught in CCTV) मिळालेल्या माहितीनुसार, बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करून नुकसान करणाऱ्या तिघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काळेबोराटेनगर येथे 12 जानेवारी 2022 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी मुईनुद्दीन खान यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वाचा : पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार पोलिसांनी सांगितले की, काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे फिर्यादी केटरिंगचे काम करत होते. त्यावेळी आरोपीने साथीदाराच्या मदतीने बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून धमकी देत शिवीगाळ करीत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण केली. दुकानातील टाईल्स फोडून नुकसान केले, सळई हवेत फिरवून आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर गायकवाड पुढील तपास करीत आहेत. जेवणाचं बिल मागितल्याचा राग, मुंबई पोलिसाने केली कॅशिअरची धुलाई मध्यरात्री हॉटेलमध्ये जाऊन भरपेट जेवण केल्यावर वेटरने बिल आणून दिल्याचा राग आल्यामुळे पोलिसाने कॅशिअरची धुलाई केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. पोलिसांच्या दादागिरीचा नमुना या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आला. रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये जेवणारा पोलीस बिल बघून इतका चिडला की त्याने थेट हाणामारी करायलाच सुरुवात केली. मुंबईतील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यानंतर एका पोलीस इन्स्पेक्टर जेवण्यासाठी गेला. भरपेट जेवण केल्यावर वेटरने त्याला बिल आणून दिलं. आपल्याला वेटरनं बिल दिल्याचा पोलिसाचा प्रचंड राग आला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपण पोलीस असून आपल्याला एका हॉटेलमध्ये बिल दिलं जाणं, हा आपला अपमान आहे, असं वाटून त्याने आक्रमक पवित्रा घेतला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Crime, Pune

पुढील बातम्या