चाकण MIDC मध्ये कंपनी मालकाची हत्या, 7 जणांनी डोक्यात घातला दगड

चाकण MIDC मध्ये कंपनी मालकाची हत्या, 7 जणांनी डोक्यात घातला दगड

हरिश्चंद्र यांना ते काम करत असलेल्या वर्कशॉपच्या बाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर आरोपी जीवन याने डोक्यात दगड घालून हरिश्चंद्र यांचा खून केला.

  • Share this:

चाकण, 18 फेब्रुवारी : चाकण परिसरातल्या एका कंपनीत शिरून मालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. भांडणाच्या रागातून सात जणांनी मारहाण करत दगडाने ठेचून कंपनी मालकाची हत्या केली. चाकण एमआयडीसी परिसरातील व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप कंपनीत ही घटना घडली आहे.

हरिश्चंद्र देटे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून याप्रकरणी जीवन डोंगरे, अश्विन कांबळे, शरद धुळे आणि त्याच्या आणखी 2 ते 3 साथीदारांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत हरिश्चंद्र आणि आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी काल दुपारच्या सुमारास हरिश्चंद्र यांना ते काम करत असलेल्या वर्कशॉपच्या बाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

इतर बातम्या - शीना बोरा हत्या: माजी आयुक्तांचा मोठा खुलासा, फडणवीसांना दिली होती चुकीची माहिती

यानंतर आरोपी जीवन याने डोक्यात दगड घालून हरिश्चंद्र यांचा खून केला. दरम्यान, या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या हत्येचा अधिक तपास पोलीस करत आहेत. हरिश्चंद्र किसनराव देठे यांची चाकण एमआयडीसीत व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक हरीश्चंद्र देठे नेहमीप्रमाणे कंपनीत आले होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर आलेल्या काही जणांशी त्यांचा वाद झाला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

इतर बातम्या - एअरटेलने सरकारचे चुकवले 10 हजार कोटी, टेलिकॉम कंपन्या आल्या रस्त्यावर

देठे यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. दरम्यान, हल्लेखोर हे अवैध प्रवाशी वाहतूक करणारे रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा ठेकेदारीसह वेगवेगळ्या कारणांनी दहशतीचा थरार सुरु झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. चाकण पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

इतर बातम्या - Coronavirus ची राजधानी दिल्लीलाही धास्ती, रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंद

First published: February 18, 2020, 9:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या