पुणे हादरलं! 5 जणांनी धारदार शस्त्राने केले मित्रावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू

औन्ध मधील नागरस रोडवर घडलेल्या या घटनेत रफिक शेख नामक तरुणाचा मृत्यू झाला असून सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 11:12 AM IST

पुणे हादरलं! 5 जणांनी धारदार शस्त्राने केले मित्रावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे, 12 ऑक्टोबर : पुण्यात हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंधच्या नागरास रोडवर मध्यरात्री रफीक लाला शेख नावाच्या युवकाची तरुणांनी हत्या केली आहे. जुन्या वादातून रफिकचा टोळक्यांनी खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तरुणाची अगदी निर्घृण हत्या झाल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून परिसरात तनाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काल मध्यरात्रीनंतर औन्ध मधील नागरस रोडवर घडलेल्या या घटनेत रफिक शेख नामक तरुणाचा मृत्यू झाला असून सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्यावसायाने रिक्षा चालक असलेल्या मयत रफिकच त्याच्या मित्रांशी जूनं भांडण होतं. त्या भांडणाचा राग मनात धरून इम्रान शेख, शुभम भिसे आणि त्यांच्या इतर तीन ते चार साथीदारांनी मिळून रात्री नागरस रोड वर उभ्या असलेल्या रफिकवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला चढवला आणि तिथून पळ काढला.

या घटनेबाबद मयत रफिकच्या भावाने पोलिसांकडे फिर्याद दिली असून चतरुशृंगी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपींचीं नावं....

1) इम्रान शेख

Loading...

2) शुभम भिसे

3) उमेश झा

4) इरफान शेख

5) युसूफ शेख

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, भाजपच्याच जिल्हाध्यक्षाने केली मागणी

रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने चिरडलं, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

भिवंडीमधील रस्त्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. वाडा भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुडूस इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात रामप्रसाद गोस्वामी (वय 60) यांचा मृत्यू झाला असून तो मुसारणे इथल्या एका कंपनीत वॉचमेन म्हणून कार्यरत होता तो मूळचा बिहार इथल्या असून वाडा तालुक्यतील कुडूस इथे राहत होता.

इतर बातम्या - देवेंद्र फडणवीसांबद्दल अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

डॉक्टर स्नेहाच्या खड्डे अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी रामप्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील भिवंडी वाडा रोडवर अपघात झाला होता. भिवंडी-वाडा मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावरील खड्ड्यांने काल, गुरूवारी एका डॉक्टर तरूणीचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना पुन्हा अपघात झाला आहे. टेम्पो खड्ड्यात आदळून एका वाटसरूच्या हात-पायावरून गेला. या अपघातात 60 वर्षीय व्यक्तीने आपला एक हात आणि पाय गमवला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुडूसजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. टेम्पो मोठ्या खड्ड्यात आदळल्याने चालकाचा ताबा सुटून रामप्रसाद या वाटसरुच्या हात आणि पायावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्याचा एक हात आणि पाय निकामी झाला आहे.

इतर बातम्या - PMC बँक घोटाळ्यासंबंधी मोठी हालचाल, राज ठाकरे काढणार तोडगा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Oct 12, 2019 10:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...