Home /News /pune /

महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा, कोर्टाकडून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशांना स्थगिती

महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा, कोर्टाकडून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशांना स्थगिती

मुरलीधर मोहोळ यांनी कोर्टात आज काही कागदपत्रे सादर केले. त्यानंतर कोर्टाने अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा (atrocities act) दाखल करण्याच्या आदेशांना स्थगिती दिली आहे.

पुणे, 9 डिसेंबर : पुणे महापालिकेकडून (PMC) एका सार्वजनिक शौचालय आणि अतिक्रमणावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. याच वादावरुन कोर्टाने पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा (atrocities act) दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण आता महापौरांनी कोर्टात कागदपत्रे सादर केल्यानंतर कोर्टाने त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे मोहोळ यांनी आता या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली.

मुरलीधर मोहोळ नेमकं काय म्हणाले?

"काल पुणे न्यायालयाने एका केसमध्ये माझ्यावर आणि आणखी एकावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश दिले होते. न्यायालायचा आदर आहे. त्यावर काही बोलणार नाही. ज्या रस्त्याचा उल्लेख करण्यात आलाय त्या मयूर डीपी रस्तामध्ये काही घरं येतात ती रिकामी करुन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. काल सगळी माहिती घेतली. त्यात आरोप केलाय की, सार्वजनिक शौचालय महापौर आणि महापालिकेने पडायचं ठरवलंय. अशा कारवाईवेळी लोकप्रतिनिधी तिथे नसतो. विकास आराखड्यात असणारा रस्ता करणं गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षांपासून हा रस्ता रिकामा करण्याचा प्रयत्न पालिका करत होती", अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. हेही वाचा : पुण्याचे महापौर Murlidhar Mohol अडचणीत, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

'स्वतःचं घर वाचवण्यासाठी जावेद शेखने लोकांना भडकवलं'

"203 पैकी 34 घराचं पुनर्वसन राहिलं होतं. त्यापैकी 33 लोकांचं स्थलांतर होतंय. एक घर आणि एक स्वछतागृह राहिलं आहे. जावेद शेख या व्यक्तीचं ते घर आहे. त्यांनी हे घर जाऊ नये यासाठी महापालिका विरोधात कोर्टात केस दाखल केलीय. ती आजही सुरु आहे. 82 कुटुंब त्या वस्तीत राहतात. त्यांचं 2013 साली पुनर्वसन झालं आहे. त्यांच्या स्थलांतराची जबाबदारी विकासकाची होती. या वस्तीमध्ये 2 स्वच्छतागृह आहेत. त्यापैकी रस्त्यात येणारं स्वछतागृह काढण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पालिकेकत पूर्ण झाली. स्वतःचं घर वाचवण्यासाठी जावेद शेखने लोकांना भडकवलं. शेख यांना 3 घरंदेखील एसआरएमधून मिळाळी आहेत", असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला.

'हे संपूर्णपणे षडयंत्र'

"जावेद शेखवर काही महिन्यांपूर्वी 25 फेब्रुवारीला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी विरोध करण्यात आलाय. कारवाई देखील थांबवली आहे. ते स्वच्छतागृह पडलेलं नाही. देविदास ओहाळ यांना पुढे आणण्यात आलं. आणि संगनमत करुन कोर्टात दावा दाखल केला. हे संपूर्णपणे षडयंत्र आहे. मी वर्षभरात त्या वस्तीत सुद्धा गेलो नाही", अशी भूमिका मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या